lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > ₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!

₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!

या कंपनीच्या शेअरला 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. महत्वाचे म्हणजे, कंपनीला मिळालेल्या एका ऑर्डरमुळे या शेअरमध्ये, ही तेजी दिसून आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 01:48 AM2024-05-01T01:48:17+5:302024-05-01T01:48:53+5:30

या कंपनीच्या शेअरला 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. महत्वाचे म्हणजे, कंपनीला मिळालेल्या एका ऑर्डरमुळे या शेअरमध्ये, ही तेजी दिसून आली आहे.

share market sprayking share hit 20 percent upper circuit after receiving an order from a japanese company | ₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!

₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!

शेअर बाजारात मंगळवारी प्रचंड चढ-उतार बघायला मिळाला. मात्र असे असतानाही, गुंतवणूकदार काही शेअर्सवर तुटून पडले होते. असाच एक शेअर म्हणजे स्प्रेकिंग लिमिटेडचा. या कंपनीच्या शेअरला 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. महत्वाचे म्हणजे, कंपनीला मिळालेल्या एका ऑर्डरमुळे या शेअरमध्ये, ही तेजी दिसून आली आहे.

स्प्रेकिंग लिमिटेडला जपानच्या फ्लोबल कॉर्पोरेशनकडून होज नोजलसाठी पहिली सॅम्पल ऑर्डर मिळाली आहे. ब्रास मॅन्युफॅक्चरिंगची लिडिंग कंपनी स्प्रेकिंगचे लक्ष्य फ्लोबल कॉर्पोरेशनच्या अचूक मानकांची पूर्तता करणाऱ्या हाय क्वालिटीच्या नळी नोजल प्रोव्हाइड करणे आहे. म्हत्वाचे म्हणजे, फ्लोबल कॉर्पोरेशन गेल्या 100 वर्षांहून अधिक काळापासून जगभरातील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी प्लंबिंग पार्ट्सच्या बाबतीत आघाडीवर आहे.

शेअरमध्ये जबरदस्त तेजी -
स्प्रेकिंग लिमिटेडच्या शेअरला मंगळवारी 20% चे अप्पर सर्किट लागले आणि तो 44.40 रुपयांवर पोहोचला. हा शेअर 42.40 रुपयांवर बंद झाला आहे. एक दिवापूर्वीच्या तुलनेत हा शेअर  14.59% ने वधारून बंद झाला. फेब्रुवारी 2024 मध्ये या शेअरची किंमत 60.04 रुपयांवर पोहोचली होती. हा शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: share market sprayking share hit 20 percent upper circuit after receiving an order from a japanese company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.