२५ लाखांचं घेतलं कर्ज, उभी केली कोट्यवधींची कंपनी; नाव' PRIYAGOLD' का ठेवलं? रंजक आहे कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 08:32 AM2024-05-18T08:32:58+5:302024-05-18T08:51:33+5:30

Success Story Priyagold Biscuit : तुम्ही प्रियागोल्ड या कंपनीचं नाव तर ऐकलंच असेल. पण त्या नावामागे काय कहाणी आहे माहितीये का? जाणून घेऊ या नावामागची कहाणी आणि कंपनीचा आजवरचा प्रवास.

एक अशी वेळ होती, जेव्हा बिस्किट म्हटलं की डोक्यात फक्त 'पारले-जी'चं नाव यायचं. १९२९ मध्ये सुरू झालेल्या पारले-जीनं अनेक दशके भारतीय बाजारपेठेवर राज्य केलं. पण, त्यानंतर बल्लभ प्रसाद अग्रवाल यांनी एन्ट्री आणि त्यांनी हा विचार बदलण्याचा प्रयत्न केला.

अग्रवाल यांनी प्रिया गोल्ड बिस्किटची पायाभरणी केली. भारतीयांना माफक दरात दर्जेदार बिस्किटं उपलब्ध करून देणं हे त्यांचं ध्येय होतं. प्रिया गोल्ड बिस्किट झपाट्यानं लोकप्रिय झालं. विशेषत: ग्रामीण भागात याची क्रेझ वाढू लागली. कंपनीनं चविष्ट आणि परवडणारी बिस्किटं मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली.

त्यानं लोकांची मनं जिंकली. आज प्रिया गोल्ड ही देशातील सर्वात मोठी बिस्किट कंपनी आहे. यामुळे पारले-जीला कडवी टक्कर मिळत आहे. पण, त्याच्या नावामागे एक रंजक किस्साही आहे. तीन मुलगे असूनही बल्लभ प्रसाद अग्रवाल यांनी कंपनीचे नाव 'प्रिया गोल्ड' का ठेवलं? चला जाणून घेऊया.

प्रिया गोल्ड हा सूर्या फूड अँड अॅग्रो लिमिटेड कंपनीचा ब्रँड आहे. कुकीज बनविण्यावर लक्ष केंद्रित करून १९९४ मध्ये ही कंपनी सुरू करण्यात आली. आज कंपनी केक, कन्फेक्शनरी, ज्यूस आणि पेये यासह विविध उत्पादनं तयार करते.

अनेकांना वाटतं की या कंपनीचं नाव त्याच्या संस्थापकाच्या एका मुलाच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. पण, खरं तर याला प्रिया गोल्ड असं नाव देण्यामागची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आहे. 'प्रिया' म्हणजे सर्वांची आवडती आणि 'गोल्ड' म्हणजे गुणवत्तेत शुद्ध आणि खरे. या निकषांच्या आधारे कंपनीच्या मालकांना आपल्या उत्पादनांची चाचणी घ्यायची होती. म्हणून त्यांनी या ब्रँडला प्रिया गोल्ड असं नाव दिलं.

प्रिया गोल्ड ब्रँड सुरू करण्यात बल्लभ प्रसाद अग्रवाल आणि त्यांच्या तीन मुलांचा मोलाचा वाटा आहे. मनोज कुमार अग्रवाल, नवीन कुमार अग्रवाल आणि शेखर अग्रवाल अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. बल्लभ प्रसाद अग्रवाल यांना बऱ्याच काळापासून बिस्किटांचा ब्रँड सुरू करायचा होता. १९९१ मध्ये ते कोलकात्याहून नोएडाला स्थायिक झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी बँकेकडून २५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन प्रिया गोल्ड ची सुरुवात केली.

१९९५ मध्ये कंपनीनं बटर बाइट बिस्किट लॉन्च केलं. उत्कृष्ट गुणवत्तेमुळे लवकरच बाजारात त्याचा दबदबा निर्माण झाला. या यशानंतर बल्लभप्रसाद अग्रवाल आणि त्यांची कंपनी विनाअडथळा पुढे जात राहिली. ग्रेटर नोएडा, सुरत आणि लखनौ मध्ये कंपनीने आपले कारखाने वाढवले. यामुळे प्रिया गोल्ड हा राष्ट्रीय ब्रँड बनला. २००६ पर्यंत कंपनीनं पेयं आणि फ्रूट ज्युस लाँन्च करून नवीन बाजारपेठेच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं.