Lockdown 4.0चं काऊंटडाऊन; आपल्या राज्याला कुठल्या सवलती मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 11:17 AM2020-05-16T11:17:05+5:302020-05-16T11:44:27+5:30

कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन लागू आहे. दोन टप्पे पार पडले आहेत आणि आता तिसरा टप्पा (लॉकडाउन 3.0) संपण्याच्या मार्गावर आहे.

लॉकडाऊन चौथा टप्पा (लॉकडाऊन 4.0) सोमवारपासून सुरू होणार आहे. या टप्प्यात अनेक राज्यांना अधिक सवलती मिळतील, अशी आशा आहे.

विशेष म्हणजे स्वत: पंतप्रधान मोदींनी त्याचे संकेत दिले आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल्स आणि थिएटर्स सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही. पण काही भागात सलून उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

तसेच आवश्यक वस्तूंचं वितरण सुरू होऊ शकते. अशा परिस्थितीत आपल्या राज्याला काय सवलत मिळणार, याचीच उत्सुकला नागरिकांना लागून राहिली आहे.

आंध्र प्रदेश राज्याकडून नॉन-कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व आर्थिक आणि सार्वजनिक उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. आतापर्यंत येथे 2100 पेक्षा जास्त कोरोना विषाणूची प्रकरणे सापडली आहेत. जवळपास 11,500 लोकांना अलगीकरणात ठेवले आहे.

माध्यमांना संबोधित करताना राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील जनतेकडून त्यांना प्रतिसाद मिळाला आहे. संक्रमण क्षेत्रामध्येही काही आर्थिक हालचाली सुरू व्हावेत, अशी दिल्लीच्या जनतेची इच्छा आहे.

दिल्लीतून काही निर्बंध हटवले पाहिजेत. दिल्लीतील बहुतेक भागांना रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहेत.

पर्यटनाचे सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य म्हणजे केरळ. लॉकडाऊन 4.0 मध्ये मेट्रो सेवा, लोकल ट्रेन, देशांतर्गत उड्डाणे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स सुरू करावीत, अशी मागणी केरळ राज्याने केली आहे.

कोरोना विषाणूची पहिली घटना केरळमध्येच नोंदली गेली होती, कोरोना विषाणूविरुद्धच्या युद्धात राज्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. येथून सुमारे 560 प्रकरणे नोंदविण्यात आली असून, त्यापैकी 500 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोना विषाणूमुळे केवळ 4 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात कर्नाटकचीही चांगली भूमिका आहे. कर्नाटक सरकारला अशी मागणी केली आहे की, राज्यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि जिम सुरू करावेत. कर्नाटकात 959 सक्रिय रुग्ण आहेत आणि जवळपास 1518 लोकांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात राज्य शासनाने पब आणि बारना दारू विक्रीस परवानगी दिली होती, पण काही अटी अन् शर्थींच्याअंतर्गत ही परवानगी होती.

लॉकडाऊन 4.0.मध्ये गुजरात सरकारची इच्छा आहे की, तेथील सर्व शहरी केंद्रांमध्ये सर्व आर्थिक उलाढाली सुरू व्हाव्यात. अहमदाबाद, सूरत आणि बडोदरासारख्या शहरांमध्ये बरीच कोरोना प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गुजरातमधल्या फक्त अहमदाबादमध्ये 70 टक्के प्रकरणे आहेत.

लॉकडाउन 4.0साठी बिहार, झारखंड, ओडिशाची वेगळी योजना आहे. इथल्या सरकारांची सर्व काही पूर्णपणे बंद व्हावे, अशी मागणी आहे, कोणतीही सवलत देऊ नये असं त्या राज्यांकडून सांगण्यात आलं आहे. या राज्यात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही 31 मेपर्यंत हा लॉकडाऊन सुरूच ठेवला आहे. जिल्ह्यांना काही सवलती देण्याचा अधिकार आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही असे म्हटले आहे की, राज्यात अशा परिस्थितीत सवलती देता येणार नाहीत. तसेच कडक बंदोबस्त लागू करावा लागेल. त्यांनी बैठकीत पंतप्रधान मोदींना सांगितले की, आमच्या राज्यात कडक लॉकडाऊन असावा, कर्फ्यू लागू राहील हे मी सुनिश्चित करणार आहे.

महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून, जवळपास 30 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. १०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. सरकारने विशिष्ट नियम व अटींसह उद्योगांना उघडण्याची परवानगी दिली आहे. काही शहरांत वाईट परिस्थिती असल्यानं काही विशेष सूट मिळणार नाही.

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, आसाममध्ये कडक लॉकडाऊन असला पाहिजे. परंतु केंद्र सरकार या प्रकरणात जो काही निर्णय घेईल तो मंजूर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कंटेन्मेंट झोनमध्येही आर्थिक हालचाली पुन्हा सुरू केल्या पाहिजेत, असे राज्याने म्हटले आहे. राज्यात मागील दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भाजी मार्केटमधून संक्रमणाची 2600 प्रकरणे नोंदली गेली आहेत. सोमवारपासून राज्यात मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच कामाचे तास आणि कारखान्यात वाढ करण्याची सवलतही सोमवारपासून लागू होणार आहेत.

Read in English