Javed Akhtar : आपण सापाला दूध पाजतोय का? अख्तर यांच्यावर राणेंचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 01:40 PM2021-09-05T13:40:24+5:302021-09-05T13:58:35+5:30

जावेद अख्तर यांनी केलेल्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. आता, भाजप नेत्यांनीही निशाणा साधत जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यासोबत राहावे, असे टीकास्त्र सोडले आहे.

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच आहे," असं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं होतं.

तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचं सांगत त्यांनी तालिबानवर टीकेची झोड उठवली. याचवेळी भारताचं तालिबान कधी होऊ शकत नाही, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

परंतु त्यांच्या वक्तव्यावरून आता रोष व्यक्त केला जात आहे. भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी जावेद अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

जावेद अख्तर यांनी केलेल्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. आता, भाजप नेत्यांनीही निशाणा साधत जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यासोबत राहावे, असे टीकास्त्र सोडले आहे.

"जावेद अख्तर यांचं वक्तव्या हे केवळ दुर्दैवी नाही तर, संघ, विश्व हिंदू परिषदेच्या कोट्यवधी कार्यकर्ते आणि जगभरातील या विचारधारेला मानणारे कोट्यवधी लोकांचा अपमान आहे!

जोपर्यंत जावेद अख्तर हाथ जोडून माफी मागत नाही तोपर्यंत त्याची, त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही चित्रपट या भूमित चालू देणार नाही," असं राम कदम म्हणाले.

राम कदम यांच्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनीही ट्विटरवरुन अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे. जावेद अख्तर यांनी पाकिस्तान किंवा तालिबानमध्ये असे विधान केले असते का? असा सवालही राणे यांनी विचारला आहे.

ज्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत... तेथेच जावेद अख्तरसारख्या लोकांनी हिंदु राष्ट्राच्या कल्पनेला विरोध केला. आपण त्यांची गाणी, चित्रपट यांना डोक्यावर घेऊन त्यांना प्रसिद्ध करा, आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या देशात सुरक्षित असल्याची खात्री द्या.

जावेद अख्तर पाकिस्तान किंवा तालिबानमध्ये जाऊन यांसारखे विधान करू शकतात का, आपण सापाला दूध पाजतोय का? असा सवालही आमदार नितेश राणेंनी विचारला आहे.

"ज्या पद्धतीनं तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत.

तालिबानी हिंसक आहेत. रानटी आहेत. पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत", असं जावेद अख्तर म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर वक्तव्य केलं होतं.