दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! महाराष्ट्रदिनी गौरी कुलकर्णीने दिल्या चाहत्यांना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 05:33 PM2024-05-01T17:33:08+5:302024-05-01T17:39:50+5:30

गौरी कुलकर्णी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे.

छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारत अभिनेत्री गौरी कुलकर्णी नावारुपाला आली.

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे करते' या मालिकेत काम करत तिने चाहत्यांची मनं जिंकली.

सध्या अभिनेत्री सन मराठी वाहिनीवर 'प्रेमास रंग यावे' या मालिकेत काम करताना दिसत आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर गौरीने एक पोस्ट शेअर केली आहे.

केसात चाफा, नाकात नथ तसेच पिस्ता रंगाची साडी परिधान करून गौरीने हे नवं फोटोशूट केलंय.

तिचे हे व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यावर तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

अभिनेत्री साक्षी गांधीने देखील गौरीच्या नव्या फोटोंवर केलेली कमेंट लक्षवेधी ठरली आहे.