Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं

IPL 2024 Play Off Qualification scenario - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील प्ले ऑफच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ सध्या शेवटच्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांना १०पैकी ३ विजय मिळवता आले आहेत आणि उर्वरित चार सामने जिंकून ते जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजेच प्ले ऑफसाठीच्या १६ गुणांची पुर्तता करणे, त्यांना शक्य नाही. तरीही अजूनही हे दोन्ही संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतात असे म्हटले तर...

राजस्थान रॉयल्सने ९ पैकी ८ सामने जिंकून १६ गुणांसह Point Table मधील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. राजस्थानला उर्वरित ५ सामन्यांत १ किंवा २ विजय हा प्ले ऑफमधील जागा निश्चित करण्यासाठी पुरेसा आहे. पण, त्याचवेळी RR च्या कामगिरीवर MI व RCB यांचे आव्हान अवलंबून आहे..

कोलकाता नाईट रायडर्स व लखनौ सुपर जायंट्स हे प्रत्येकी १२ गुणांसह अनुक्रम दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. KKRचे ५, तर LSG चे ४ सामने शिल्लक आहेत आणि त्यांना किमान २ विजय प्ले ऑफची दावेदारी सांगण्यासाठी पुरेसे आहेत.

चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स यांचे प्रत्येकी १० गुण आहेत आणि प्ले ऑफच्या चौथ्या जागेसाठी यांच्यात चुरस आहे. CSK व SRH यांनी प्रत्येकी ९ सामने खेळले आहेत आणि त्यांचे अजून ५ सामने शिल्लक आहेत. त्यात त्यांना किमान ३ विजय मिळवावे लागतील. DC चे ११ सामने झाले आहेत आणि त्यांना उर्वरित तिन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.

आता राहिले गुजरात टायनट्स व पंजाब किंग्स... GT ने १० सामन्यांत ४ विजय मिळवून ८ गुण कमावले आहेत आणि त्यांना १६ अंकासाठी उर्वरित चार सामने जिंकावे लागतील. तेच PBKS ला ९ सामन्यांत ६ गुण कमावता आले आहेत आणि त्यांना पाचही सामने जिंकणे गरजेचे आहे.

मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याही खात्यात प्रत्येकी ६ गुण आहेत, परंतु त्यांनी १० सामने खेळले आहेत आणि उर्वरित ४ सामने जिंकूनही ते १४ अंकापर्यंत मजल मारू शकतात.

मुंबई व बंगळुरू यांनी त्यांचे उर्वरित तिन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. त्याचवेळी राजस्थानने ५ सामने जिंकून २६ गुण कमावणे त्यांच्या फायद्याचे ठरेल. कोलकाताने २ विजय मिळवून १६ गुण कमावणे गरजेचे आहे. त्याचवेळी CSK, SRH, DC यांना उर्वरित सामन्यांत फक्त १ विजय मिळाल्यास ते १२ गुणांवर अडकतील.

LSG चा एकही विजय होता कामा नये. पंजाब किंग्सने ३ विजय मिळवून १२ गुण कमावणे गरजेचे आहे, तर गुजरात टायटन्स फक्त १ विजय मिळवून १० गुणांवर अडकल्यास मुंबई व बंगळुरू प्रत्येकी १४ गुणांसह प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतात.