पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 04:59 PM2024-05-01T16:59:15+5:302024-05-01T17:01:14+5:30

पाकिस्तानने आपल्या चंद्र मोहिमेला ICUBE-Q असे नाव दिले आहे.

Pakistan wants to compete with India, 'Chandrayaan' will be launched Know about the whole mission | पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेपासूनच अस्वस्थ दिसत असलेला पाकिस्तानही आता चंद्रयान लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, आर्थिक संकटाचा सामना करत असतानाही पाकिस्तानने ही मोहीम हाती घेतली आहे. मात्र असे असले तरी पाकिस्तानचे चंद्रयान भारताच्या चंद्रयानाच्या जवळपासही नाही. पाकिस्तानचे चंद्रयान (ICUBE-Q) शुक्रवारी (3 मे) चीनच्या हेनान येथून चांग'ई 6 वर स्वार होऊन चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. अर्थात पाकिस्तानला स्वबळावर नव्हे, तर चीनच्या बळावर भारताची बरोबरी करायची आहे. पाकिस्तानचे हे उपकरण चंद्रावर उतरणार नसून केवळ त्याच्या कक्षेत राहणार आहे.

पाकिस्तानने आपल्या चंद्र मोहिमेला ICUBE-Q असे नाव दिले आहे. खरे तर हे एक एक सॅटेलाइट आहे. ते चंद्रासंदर्भातील माहिती शेअर करेल. इंस्टीट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीने (आयएसटी) दिलेल्या महितीनुसार, त्यांनी हे सॅटेलाइट चीनची शंघाय युनिव्हर्सिटी एसजेटीयू आणि पाकिस्तानची राष्ट्रीय अंतराळ संस्था सुपारकोच्या मदतीने डिझाइन आणि तयार केले आहे.

आयसीयूबीई-क्यू ऑर्बिटरमध्ये दोन ऑप्टिकल कॅमरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे चंद्राच्या पृष्ठभागावरील फोटो क्लिक करतील. महत्वाचे म्हणजे, अनेक चाचण्यांनंतर, पाकिस्तानने आपले ऑर्बिटर ICUBE-Q चांग'ई-6 मिशनशी जोडले आहे. चांग’ई6 चीनच्या चंद्र मोहिमेची सहावी सीरीज आहे. ज्या प्रमाणे, भारताने पहिले चंद्रयान, मग चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 लॉन्च केले. त्याच पद्धतीने चीनही साहव्यांदा चंद्राशी संबंधित मोहीम लॉन्च करत आहे.

चीनची चंद्र मोहीम चांग'इ 6, चंद्राच्या पृष्ठ भागावर लॅड करेल आणि तेथून नमूने एकत्रित करून धरतीवर आणेन. हे मिशन पाकिस्तानसाठी विशेष मानले जात आहे. कारण ते IST ने विकसित केलेले ICUBE-Q हे पाकिस्तानी CubeSat सॅटेलाइट देखील घेऊन जाईल. छोट्या सॅटेलाइटला क्यूबसॅट म्हटले जाते.

Web Title: Pakistan wants to compete with India, 'Chandrayaan' will be launched Know about the whole mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.