नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:30 IST2025-05-21T10:22:47+5:302025-05-21T10:30:01+5:30

Indian Navy ancient stitched ship: तुमची उत्सुकता ताणली गेली असेल ना, हो भारताकडे आजपासून असे जहाज असेल जे जगातील कोणत्याही नौदलाकडे असणार नाही. भारताचे आरामार किती समृद्ध आणि शक्तीशाली होते हे आज जगाला समजणार आहे.

भारतीय नौदलासाठी तसेच भारतीय आरमाराच्या इतिहासासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. कारण भारताच्या नौदलाच्या ताफ्यात आज असे जहाज सहभागी होणार आहे, जे जगात कोणत्याही देशाकडे नाही.

तुमची उत्सुकता ताणली गेली असेल ना, हो भारताकडे आजपासून असे जहाज असेल जे जगातील कोणत्याही नौदलाकडे असणार नाही. भारताचे आरामार किती समृद्ध आणि शक्तीशाली होते हे आज जगाला समजणार आहे.

आज नौदलाला मिळणारे हे जहाज शेकडो वर्षांच्या तंत्राद्वारे बांधण्यात आले आहे. नौदलात सहभागी झाल्यावर याचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. फेब्रुवारीमध्ये हे जहाज गोव्यात नौदलाच्या ताब्यात देण्यात आले होते.

आझादी का अमृत महोत्सवाच्या भाग म्हणून एका औपचारिक कार्यक्रमात आज नौदलात प्राचीन शिलाईचे जहाज सहभागी केले जाणार आहे. कारवार येथील नौदल तळावर या जहाजाचे अनावरण केले जाणार आहे. याचवेळी या जहाजाचे नावही जाहीर केले जाणार आहे.

५ व्या शतकातील एका जहाजाची ही एक कॉपी असणार आहे. जुलै २०२३ मध्ये सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय नौदल आणि होडी इनोव्हेशन्स यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करार झाला होता. यानंतर या जहाज बांधणीला सुरुवात करण्यात आली.

केरळच्या कारागिरांनी या जहाजाची निर्मिती केली आहे. लाकडी फळ्या नारळाच्या काथ्यापासून बनविलेल्या दोरांनी एकमेकांत गुंफण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने या प्रकल्पाला निधी होता.

प्रसिद्ध जहाज निर्माता बाबू शंकरण यांनी या जहाज निर्मितीच्या टीमचे नेतृत्व केले आहे. अशाप्रकारच्या जहाजाचा कुठेच ढाचा राहिलेला नाही. यामुळे हे जहाज अजिंठा लेण्यांमधील चित्रांवरून या जहाजाची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे.

हे जहाज भारतीय आरमाराची संस्कृती सांगत हे जहाज गुजरातहून ओमानच्या भ्रमंतीवर निघणार आहे, तसेच हे जहाज जगातील प्राचीन जलमार्गांवर पाठविले जाणार आहे.