करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:14 IST2025-10-17T13:38:54+5:302025-10-17T14:14:35+5:30

Rivaba Jadeja wife Ravindra Jadeja Gujarat Minister: गुजरातच्या नव्या मंत्रिमंडळात रिवाबा जाडेजाला मिळाले मंत्रिपद

गुजरातच्या राजकारणात उलथापालथ झाली आणि टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा गुजरात सरकारमध्ये मंत्री झाली.

रिवाबा यांनी २०२२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर जामनगर उत्तर मतदारसंघातून गुजरात विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली.

राजकारणात येऊन फक्त तीन वर्षे झाली असताना रिवाबा जाडेजा यांना गुजरातच्या भाजप सरकारमध्ये एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

५ सप्टेंबर १९९० रोजी जन्मलेल्या रिवाबा यांनी राजकोटच्या आत्मीय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

१७ एप्रिल २०१६ रोजी त्यांचे क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाशी लग्न केले. एका खाजगी समारंभात हा विवाह पार पडला, ज्यामध्ये फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्र होते.

रवींद्र जाडेजा आणि रिवाबा सोलंकी यांच्या लग्नाचे विधी पारंपारिक रीतिरिवाजांनुसार पार पडले आणि या खास प्रसंगाचे फोटोही साऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला.

रिवाबा ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरि सिंह सोलंकी यांची नातेवाईक आहे. ती राजपूत समुदायाची संघटना असलेल्या करणी सेनेच्या महिला शाखेची अध्यक्ष होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या औपचारिकपणे भारतीय जनता पक्षात सामील झाल्या आणि जामनगर-सौराष्ट्र प्रदेशात त्यांनी कामाला सुरूवात केली.

समाजकार्य सुरू केल्यानंतर जामनगर (उत्तर) या मतदारसंघातून धर्मेंद्रसिंह जाडेजा यांच्या जागी रिवाबा यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली.

रिवाबा जाडेजा यांनी जामनगर उत्तर मधून आम आदमी पक्षाचे करसन करमूर यांचा तब्बल ५३ हजार ५७० मतांनी पराभूत केला आणि गुजरात विधानसभेत प्रवेश केला.

निवडणुकीदरम्यान रवींद्र जाडेजाने पत्नीला पाठिंबा देत प्रचार केला होता. त्यानंतर आता गुजरातच्या मंत्रिमंडळातील फेरबदलादरम्यान रिबावांना मंत्रीपद मिळाले.