ब्रिजभूषण सिंह भाजपासाठी किती महत्वाचे? सपात गेले तरी जिंकलेले, दाऊदशी संबंध, 50 शैक्षणिक संस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 10:37 PM2023-04-29T22:37:56+5:302023-04-29T22:44:03+5:30

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध दिल्लीत लैंगिक छळाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून दिल्ली पोलीस याकडे दुर्लक्ष करत होते. आता जंतर मंतरवरील रेसलर्स ब्रिजभूषण सिंहांच्या अटकेची मागणी करत आहेत.

मी गुन्हेगार म्हणून राजीनामा देणार नाही. मी निर्दोष आहे आणि तपासात सहकार्य करेन, असे ब्रिजभूषण सिंहांनी म्हटले आहे. ब्रिजभूषण हे यूपीमधील कैसरगंजचे खासदार असून त्यांचे भाजपशी जुने संबंध आहेत. हे प्रकरण एवढे वाढले तरी भाजपाने यावर एक अवाक्षरही काढलेले नाहीय. ब्रिजभूषण यांचे केवळ गोंडाच नव्हे तर अयोध्या, श्रावस्ती, बाराबंकीसह जवळपासच्या लोकसभेच्या जागांवरही वर्चस्व आहे.

ब्रिजभूषण हे 1991 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. ते आणि त्यांची पत्नी या मतदारसंघातून खासदार झालेल्या आहेत. 996 मध्ये ब्रिजभूषण यांचे तिकीट कापले गेले होते. दाऊद इब्राहिमच्या साथीदारांना आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर होता.

यामुळे भाजपने त्यांच्या पत्नी केकती देवी सिंह यांना गोंडामधून उमेदवारी दिली होती, त्या निवडून आल्या होत्या. परंतू, १९९८ मध्ये समाजवादी पक्षाच्या कीर्तीवर्धन सिंग यांनी त्यांना पराभूत केले होते.

ब्रिजभूषण शरण सिंह हे विहिंपचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या अत्यंत जवळचे आहेत. योध्येतून शिक्षण घेतले आणि त्यानंतर विद्यार्थी राजकारणात त्यांची कारकीर्द सुरू झाली. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद प्रकरणात ब्रिजभूषण यांच्यासह अनेकांवर जनभावना भडकावल्याचा आरोप करण्यात आला होता.

सुमारे 50 शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ब्रिजभूषण यांनी आपला दबदबा कायम ठेवला होता. त्यांच्या नातेवाईकांनीही अशा संस्था स्थापन केल्या आहेत.

त्यांनी त्यांची ही यंत्रणा पक्षापासून वेगळी राबविलेली आहे. यामुळे भाजपच्या स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे, यावरून सिंह यांची पक्षाला जितकी गरज आहे तितकीच त्यांना पक्षाची गरज आहे.

ब्रिजभूषण यांनी २००९ मध्ये भाजपचा कमी होत चाललेला प्रभाव ओळखून सपाची वाट धरली. कैसरगंजमधून भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून ते विजयी झालेले. यामुळे ब्रिजभूषण यांच्यापेक्षा भाजपालाच त्यांची गरज असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.