'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 07:06 PM2024-04-29T19:06:08+5:302024-04-29T19:06:57+5:30

काही दिवसांपूर्वी सेटवरुन रणबीर आणि साई पल्लवीचा श्रीराम-सीतेच्या लूकमधील फोटो समोर आला.

Rimple and harmanpreet disigner pair will work for ramayan after sanjay leela bhansali s heeramandi | 'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन

'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन

'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आगामी 'रामायण' (Ramayan) सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. बहुप्रतिक्षित आणि बिग बजेट असा हा सिनेमा असणार आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर साई पल्लवी सीतामातेची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी सेटवरुन रणबीर आणि साई पल्लवीचा श्रीराम-सीतेच्या लूकमधील फोटो समोर आला. आता या दोघांचं कॉस्च्युम डिझाईन कोणी केलंय हेही समोर आलं आहे. डिझायनर्सचं दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत (Sanjay Leela Bhansali) खास कनेक्शन आहे.

लांब केस, कानात कुंडले आणि बाजू बंद अशा लूकमध्ये रणबीर कपूर दिसत आहे.खांद्यावर उपरणं, गळ्यात माळ , दागिने परिधान केलं आहे. तर साई पल्लवी भरजरी साडीत दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसून येतंय.  त्यांचा हा लूक रिंपल आणि हरप्रीत या डिझायनर जोडीने डिझाईन केला आहे. 'रामायण'च्या इतर स्टारकास्टसाठीही ही जोडी कॉस्च्युम डिझाईन करणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रिंपल आणि हरप्रीतने कन्फर्म केले आहे की तेच 'रामायण'साठी डिझायनर म्हणून कन्फर्म झाले आहेत. त्यांन ही संधी मिळाली आहे. आपल्या संस्कृतीत रामायणाचं मोठं महत्व आहे असं म्हणत त्यांनी काम सुरु केलंय

संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी' ही वेबसीरिज 1 मे पासून प्रदर्शित होत आहे. भन्साळींचा प्रोजेक्ट म्हटलं की भव्य आणि आलिशान सेट, महागडे कॉस्च्युम ही त्यांची खासियतच आहे. त्यांच्या 'हीरामंडी' साठी रिंपल आणि हरप्रीतनेच कॉस्च्युम डिझाईन केले आहेत. आता या जोडीला 'रामायण' या बिग बजेट सिनेमाची संधी मिळाली आहे. 

Web Title: Rimple and harmanpreet disigner pair will work for ramayan after sanjay leela bhansali s heeramandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.