शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 01:21 PM2024-05-16T13:21:49+5:302024-05-16T13:33:55+5:30

शुक्र ग्रह स्वराशीत प्रवेश करत असून, कोणत्या राशींना आगामी काळ उत्तम फलदायी ठरू शकेल, ते जाणून घ्या...

मे महिन्यात वृषभ राशीत अनेकविध शुभ योग जुळून येत आहेत. गुरु ग्रहाचे गोचर या वर्षीचे महत्त्वाचे आणि विशेष मानले गेले आहे. गुरु ग्रहानंतर सूर्य ग्रह वृषभ राशीत विराजमान झाला आहे. सुमारे महिनाभर सूर्य वृषभ राशीत असेल. सूर्याच्या या राशीसंक्रमण काळाला वृषभ संक्रांत असे म्हटले जात आहे.

तर सूर्य ग्रहानंतर शुक्र ग्रह वृषभ राशीत येणार आहे. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे स्वराशीत होत असलेला शुक्राचा प्रवेश विशेष मानला जात आहे. शुक्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या युतीने शुक्रादित्य राजयोग तयार होत आहे. तसेच गुरु, सूर्य आणि शुक्र यांच्या युतीने त्रिग्रही योग जुळून येत आहे.

शुक्रादित्य योगाचा लाभ काही राशींना होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर शुक्र आणि सूर्य यांची कृपा कोणत्या राशींवर होऊ शकते, ते जाणून घेऊया...

मेष: नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. आर्थिक बाजू मजबूत होईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेत वाढ होईल.

वृषभ: सर्वाधिक फायदा होऊ शकेल. नोकरदारांना काही मोठे यश मिळू शकेल. अनेक संधी मिळतील. कौटुंबिक जीवनात अधिक आनंद आणि शांतता अनुभवू शकाल. मित्र सदैव पाठिंबा देण्यासाठी तयार असतील. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतात.

मिथुन: व्यवहारासाठी वेळ शुभ आहे. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. हा काळ वरदानापेक्षा कमी नाही.

सिंह: फायदेशीर सिद्ध होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मोठे पद मिळू शकते. व्यापारी वर्गातील लोकांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. वडिलांचे सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो.

कन्या: जीवनात आनंद आणि प्रगती येऊ शकेल. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी वेळ शुभ आहे. पदोन्नतीची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी सर्वजण कामाची प्रशंसा करतील.

वृश्चिक: शुभ सिद्ध होऊ शकेल. उत्पन्नात वाढ दिसेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरी मिळू शकते. गुंतवणुकीतून दुप्पट नफा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रगती होऊ शकते.

धनु: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ आहे. जोडीदारासोबत वेळ घालवा. कठोर परिश्रम करून कामात नक्कीच यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

कुंभ: अनुकूल सिद्ध होऊ शकते. भौतिक सुख मिळू शकते. वाहने आणि मालमत्ता खरेदी करू शकता. आनंद आणि समाधान प्राप्त होऊ शकेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. स्थावर मालमत्ता आणि मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.