दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 01:48 PM2024-05-16T13:48:14+5:302024-05-16T13:49:07+5:30
तुमच्यात जिद्द जास्त असेल तर जगातील कोणताही अडथळा तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही.
जर तुमच्यात जिद्द जास्त असेल तर जगातील कोणताही अडथळा तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही. छपरा शहरातील भगवान बाजार येथे राहणाऱ्या निर्मला कुमारी हिने हे सिद्ध करून दाखवलं आहे. निर्मला दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून तिने हजारो लोकांचा जीव वाचवला आहे. ज्यावेळी आपण कोरोनाच्या भीतीने घरात बसलो होतो. त्यावेळी ती घरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात लोकांची कोरोना चाचणी करत होती.
निर्मला कुमारी हिच्या कुटुंबीयांनी तिला ड्युटी सेंटरमध्ये जाण्यास मनाई केली होती. पण तिने तिच्या घरातील लोकांना समजावून सांगितलं आणि तिला सेंटरमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं, यानंतर तिच्या घरातील लोकांनी तिला सेंटरमध्ये सोडलं, त्यानंतर तिने ठरवलं की काहीही झालं तरी ती अशा पीडित लोकांना मरताना पाहू शकत नाही. दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही निर्मलाने कोरोनाला आव्हान दिले आणि तपासाची जबाबदारी स्वीकारली.
निर्मलाचा उदात्त हेतू पाहून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले. मात्र पण एक दिवस निर्मलालाच कोरोनाची लागण झाली, असे असूनही निर्मलाचे मनोबल खूप उंचावले होते. निर्मला 2 महिने कोरोनाचा सामना करत राहिली, शेवटी तिच्या हिंमतीने कोरोनाचा पराभव केला आणि जिंकली. पुन्हा एकदा आरोग्य सेवा देण्यासाठी निर्मला मैदानात उतरली.
निर्मला कुमारी म्हणाली की, मला सुरुवातीपासूनच आरोग्य क्षेत्रात सेवा करायची होती. जे स्वप्न मी माझ्या मेहनतीने आणि समर्पणाने साकार केलं आहे. मला जिथे कुठेही सेवा करण्यासाठी पाठवलं जातं तिथे मी निःस्वार्थपणे सेवा करते. मुलांच्या लसीकरणासाठी मी मुख्यालयापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात गेली आहे. 2015 मध्ये आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली आणि आजपर्यंत सेवा देत आहे. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.