इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:53 IST2025-06-18T17:27:23+5:302025-06-18T17:53:43+5:30

२०२५ हे वर्ष आनंदात सुरू झाले पण दोन महिन्यानंतर जगात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. २०२५ या वर्षासारखेच १९४१हे वर्षही होतं. १९४१ या वर्षाचं कॅलेंडर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

२०२५ या वर्षातील सहा महिने पूर्ण झाली आहेत. हे वर्ष सर्वांच्या लक्षात राहणार आहे. या वर्षांत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. गेल्या ६ महिन्यांत अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यांनी मानवतेला हादरवून सोडले आहे. जगभरात युद्धासारखी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात झाला. तर या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या जंगलात भीषण आग लागली होती.

काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये २०२५ चे कॅलेंडर अगदी १९४१ सारखे आहे, असा दावा केला आहे. तारखा आणि दिवसही तेच आहेत. जरी दोन वेगवेगळ्या वर्षांच्या कॅलेंडरमध्ये समानता असणे ही मोठी गोष्ट नाही, परंतु १९४१ ते २०२५ मधील अपघात आणि प्रकरणे सारखीच आहेत.

१९४१ आणि २०२५ चे कॅलेंडर सारखेच आहे. हे असं पहिल्यांदाच घडलेले नाही. दर काही दशकांनी, एका वर्षाचे कॅलेंडर मागील वर्षाशी जुळू शकते. म्हणजेच, आठवड्याचा दिवस आणि तारीख सारखीच असू शकते.

१९४१ आणि २०२५ ही दोन्ही वर्षं लीव वर्षे आहेत. दोन्ही वर्षी १ जानेवारी बुधवारी होता. माहितीनुसार, कॅलेंडरचे असे चक्र सहसा दर २८ वर्षांनी पुनरावृत्ती होते कारण ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये आठवड्याचे दिवस आणि तारखा या चक्रात पुनरावृत्ती होतात. त्यामुळे, दोन्ही वर्षांचे कॅलेंडर अगदी सारखेच असते. प्रत्येक महिन्याची तारीख आणि दिवस सारखेच असतात.

हे लीप वर्षाच्या पद्धतीमुळे आणि ७ दिवसांच्या आठवड्याच्या चक्रामुळे घडते, असा एक सिद्धांत आहे.

१९४१ हे दुसऱ्या महायुद्धासाठी महत्त्वाचे आणि निर्णायक वर्ष होते. या वर्षी जर्मनीने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला. जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला. यावेळी अमेरिकेने देखील युद्धात उडी घेतली.

युरोप, आफ्रिका आणि आशियामध्येही या युद्धाचा वाईट परिणाम होत होता. दुसऱ्या महायुद्धात रशिया आणि अमेरिका थेट युद्धात सहभागी झाले होते.

२०२५ मध्ये, एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी भारतात पहलगाम दहशतवादी हल्ला केला.

त्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवस लष्करी संघर्ष सुरू राहिला. दरम्यान, इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी जाहीर होताच, इस्रायलने इराणवर हल्ला केला. युरोपपासून मध्य पूर्वेपर्यंत, सर्व काही युद्धाच्या विळख्यात आहे.

एकीकडे रशिया युक्रेनशी लढत आहे. दुसरीकडे, अमेरिका इस्रायल-हमास, इस्रायल-इराण संघर्षात पूर्णपणे सहभागी आहे. या वर्षाच्या प्रत्येक दिवसाबरोबर जग एका महायुद्धाकडे वाटचाल करत आहे. १९४१ सारखेच संपूर्ण जग महायुद्धात अडकेल याची भीती आता लोकांना आहे.

मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये तणाव सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले वाढवले आहेत. या दोन देशातील तणावाचा परिणाम आता जगावर दिसत आहे.