फ्लॅशबॅक 2016 : जून

By admin | Published: December 24, 2016 12:00 AM2016-12-24T00:00:00+5:302016-12-24T00:00:00+5:30

जून 29 : केंद्रीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तब्बल 23.5 टक्के वेतनवाढ झाली

29 जून : ठाण्यातील चेकमेट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील पाच कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली होती

24 जून : सार्वमताद्वारे ब्रिटनच्या जनतेनं युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत

22 जून : इस्रोनं एकाच प्रक्षेपकाच्या सहाय्याने एकूण 1288 किलो वजनाचे तब्बल 20 उपग्रह अंतराळात सोडले होते

इफेड्रिन ड्रग्जच्या तस्करीत अभिनेत्री ममता कुलकर्मीचा सहभाग असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली होती

18 जून : भारतीय हवाई दलात प्रथमच तीन महिला लढाऊ वैमानिकांचा समावेश करण्यात आला

मुंबई महापालिकेच्या विविध रस्ते कामांतील घोटाळ्यावरुन खासगी कंपनीच्या 10 लेखानिरीक्षकांना अटक करण्यात आली होती

14 जून : विविध बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पलायन केलेला मद्यसम्राट विजय माल्याला

12 जून : फ्लोरिडामधील ओललँडो येथे तरुणाने केलेल्या अंदाधुंदा गोळीबारात 50 जणांचा मृत्यू झाला होता तर 53 जण जखमी झाले होते

10 जून : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी सीबीआयने वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली. याप्रकरणातील ही पहिली अटक होती

8 जून : टेनिसस्टार मारिया शारापोव्हावर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेदरम्यान उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली होती

नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच खुल्या चषकाला गवसणी घातल ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम केला होता. त्याने ऑस्ट्रेलियन खुली फ्रेंच खुली विम्बल्डन आणि अमेरिकन या चारही ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवत दुर्मिळ विक्रम केला

4 जून : नाट्य- चित्रपट चळवळीच्या प्रवाहात स्वतःला झोकून देणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन

4 जून : बॉक्सिंगसम्राट मोहम्मद अली कालवश

4 जून : पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता

3 जून : मथुरेतील जवाहर बाग परिसरातील अतिक्रमण हटवताना झालेल्या हिंसाचारात 24 जणांचा मृत्यू झाला होता यात दोन पोलीस अधिका-यांचाही समावेश होता