Dr. Manmohansingh: डॉ. मनमोहनसिंगांना मतदान करताना पाहून हळहळ, नेटीझन्सचा सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 06:24 PM2022-07-18T18:24:28+5:302022-07-18T18:33:47+5:30

Dr. Manmohansingh: राष्ट्रपती निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात होताच नेतेमंडळींनी मतदान केल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झटपट व्हायरल झाले.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात होताच नेतेमंडळींनी मतदान केल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झटपट व्हायरल झाले.

हजारीबागचे भाजपा खासदार जयंत सिन्हा यांनी सकाळी सव्वा ११च्या सुमारास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले. त्यांचा फोटो सोशल मीडियावर येताच एक वेगळीच चर्चा सुरू झाली. आणि फोटो व्हायरल झाला.

कारण, जयंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे पुत्र आहेत. अशा स्थितीत लोकांनी जयंत सिन्हा यांना प्रश्न विचारायला सुरूवात केली की जयंत सिन्हा यांनी आपल्या वडीलांना मतदान केले की वडीलांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले?

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे तर व्हील-चेअरवरून मतदानासाठी आले. एक-एक करत शिस्तबद्ध पद्धतीने संसद भवनाच्या आतील नेत्यांची छायाचित्रे मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

डॉ. मनमोहनसिंग यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आपल्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेचं उदाहरण देत त्यांच्या पक्षनिष्ठेचं कौतुक होत आहे.

सोशल मीडियावर डॉ. सिंग यांचा फोटो पाहून अनेकांनी हळहळ ही व्यक्त केली आहे. माजी पंतप्रधानांबद्दल अनेकांनी आदर व्यक्त करत त्यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवली.

डॉ. मनमोहनसिंग यांना मतदान करतानाही चारही बाजूंनी तेथील अधिकाऱ्यांनी पकडले होते. अशा नाजूक प्रकृतीपरिस्थितीतीही सिंग यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

सिंग यांच्या या कर्तव्यदक्षेतेला नेटीझन्सने सलाम केला असून अनेकजण भावूक झाल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळालं.