भीमजयंती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास दुर्मीळ फोटो....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 09:46 AM2020-04-14T09:46:02+5:302020-04-14T12:58:27+5:30

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 129 वी जयंती जगभरात घराघरात साजरी केली जात आहे. या वर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सगळ्याच ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऑनलाईन साजरी केली जात आहे. त्यामुळे डिजिटल स्वरूपात सगळे कार्यक्रम आज साजरे केले जाणार आहेत. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे काही खास, दुर्मीळ फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर) ही आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब.

१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. 'जय भीम' या घोषणेनंतर देशात 'जय हिंद' ही घोषणा सुरु झाली.

भारतातील कोणत्याही नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे.