CoronaVirus Updates: देशात नव्या ४३ हजार ३९२ कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईतील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 10:51 AM2021-07-09T10:51:31+5:302021-07-09T10:54:00+5:30

देशभरात गेल्या २४ तासांत ४३ हजार ३९२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०७ लाख ५२ हजार ९५० वर पोहचली आहे. देशात सध्या ४ लाख ५८ हजार ७२७ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ४४ हजार ४५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत २ कोटी ९८ लाख ८८ हजार २८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी थोडी घट दिसून आली. गुरुवारी ५४० बाधित रुग्ण आढळून आले, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर मात्र ०.०८ टक्के एवढा आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ८५८ दिवसांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत मुंबईत सात लाख २६ हजार ८२४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख एक हजार १९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ५८६ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार ७१४ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या १३ रुग्णांपैकी १२ रुग्णांना सहव्याधी होत्या.

मृतांमध्ये सात पुरुष, तर सहा महिला रुग्णांचा समावेश होता. एक मृत रुग्ण ४० वर्षांखालील होता. १० मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर दोन रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात ३७ हजार ८०२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७४ लाख २३ हजार ४८३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.