CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख ३५ हजार ५३२ नवे रुग्ण; ८७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 09:56 AM2022-01-29T09:56:46+5:302022-01-29T09:59:46+5:30

देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे धोका कायम आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख ३५ हजार ५३२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या दिवसभरात ३ लाख ३५ हजार ९३९ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या २० लाख ०४ हजार ३३३ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी २४ हजार ९४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ७६ लाख ५५ हजार ५५४ झाली आहे. तर, सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ६६ हजार ५८६ आहे. राज्यभरात शुक्रवारी ४५ हजार ६४८ कोविड रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत ७२ लाख ४२ हजार ६४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत; तर, आजच्या १०३ जणांच्या नोंदीसह आतापर्यंतच्या मृतांचा आकडा १ लाख ४२ हजार ४६१ आहे. शुक्रवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ४१ लाख ६३ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६ लाख ५५ हजार ५५४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ६१ हजार ३७० व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. ३ हजार २०० जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.