CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 08:41 AM2020-06-16T08:41:07+5:302020-06-16T08:53:10+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या सोशल मीडियावर काही फोटो जोरदार व्हायरल होत आहेत यामध्ये डॉक्टरांनी पीपीई सूटवर आता आपले फोटो लावल्याचं दिसत आहे. पण यामागचं नेमकं कारण समजल्यावर तुम्हीही डॉक्टरांना सलाम कराल.

जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत अमेरिका प्रथम स्थानी, दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील, तिसऱ्या स्थानी रशिया आहे.

भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, ही गोष्ट अतिशय चिंताजनक आहे असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तीन लाखांच्या वर गेली असून 9 हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.

कुटुंबापासून दूर राहून डॉक्टर कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांना पीपीई किट देण्यात आले आहे. ते पीपीई सूट परिधान करत आहेत.

सध्या सोशल मीडियावर काही फोटो जोरदार व्हायरल होत आहेत यामध्ये डॉक्टरांनी पीपीई सूटवर आता आपले फोटो लावल्याचं दिसत आहे. पण यामागचं नेमकं कारण समजल्यावर तुम्हीही डॉक्टरांना सलाम कराल.

अरुणाचल प्रदेशच्या चांगलांग जिल्ह्यातील कोरोना व्हायरस केअर सेंटर्समधील डॉक्टरांनी आपले फोटो पीपीई सूटवर लावले आहेत. कोरोना रुग्णांसाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

चांगलांगचे जिल्हाधिकारी देवांश यादव यांनी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले असून या फोटोंनी लोकांचं मन जिंकलं आहे.

चांगलांगमधील कोविड केअर सेंटर्समधील आमच्या कोरोना योद्धांनी आपल्या पीपीई सूटच्या समोर आपले फोटो लावलेत. यामुळे या मास्कमागे नेमका चेहरा कुणाचा आहे, हे रुग्णाला समजेल आणि त्याला मानसिकरित्या बरं वाटेल असं म्हटलं आहे.

रुग्णावर शारीरिक उपचार जितके महत्त्वाचे आहेत तसेच त्याचे मानसिक आरोग्य जपणेही गरजेचे आहे. रुग्ण मानसिकरित्या जितका मजबूत तितकीच त्याच्यामध्ये सुधारणा लवकर होते.

यादव यांनी माझ्या काही मित्रांकडून ऐकलं की न्यूयॉर्कमधील डॉक्टरांनी पीपीई सूटवर आपले फोटो लावायला सुरुवात केल्याचं म्हटलं आहे.

पीपीई सूट घातलेला एखादा डॉक्टर येतो आणि आपल्यावर आवश्यक ते उपचार करून आणि तपासणी करून निघून जातो. चेहरा न दिसल्याने रुग्णांना अनेक प्रश्न पडू शकतात.

आपली सेवा करणारी व्यक्ती नेमकी कशी दिसते यासह काही गोष्टी न पाहताच अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मानसिकतेवरही याचा परिणाम होतो.

रुग्ण आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा चेहरा कित्येक आठवडे, कित्येक महिने पाहू शकले नाही. मानवी चेहरा न पाहताच काही रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अरुणाचल प्रदेशमधील डॉक्टरांनीही घेतलेल्या या निर्णयाचं सर्वांनी कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.