दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 04:14 PM2020-05-05T16:14:02+5:302020-05-05T16:21:29+5:30

खरेतर दारू ही राज्याच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. यामुळेच राज्ये दारुच्या दुकानांना परवानगी देण्याची मागणी करत होते. लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसांत हरियाणामध्ये ही दुकाने सुरु ठेवण्यात आली होती.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारुची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली. परवानगी मिळाल्याचे कळताच ४० दिवस कळ सोसणाऱ्या तळीरामांनी अगदी दिवस उजाडायच्या आधीपासूनच दुकानांसमोर रांगा लावायला सुरुवात केली.

खरेतर पाच ग्राहकच दुकानासमोर असण्याचे बंधन घालण्यात आले होते. मात्र, सोशल डिस्टन्सिंगची वाट लावत या तळीरामांनी झुंबड उडविल्याने अनेक ठिकाणी ही दुकाने सील करावी लागली.

राज्य सरकारांनी घेतलेला हा निर्णय खरेतर ठप्प झालेला महसूल वाढविण्यासाठी होता. कोरोना विरोधातील लढाई, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, वाहनांचे इंधन आदी अनेक खर्च आवासून उभे होते. यामुळे सरकारांनी दारूची दुकाने सुरु करण्याची तयारी केली.

एका दिवसात उत्तर प्रदेशात ३०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची दारू विकली गेली. तर राजस्थानमध्ये दोन तासांत ६० कोटींची दारू विकली गेली.

रेड झोनमध्ये जरी ही दुकाने उघडलेली नसली तरीही दारुच्या या विक्रमी विक्रीमुळे राज्य सरकारांना मोठा फायदा झाला आहे. दारुपासून राज्यांना हजारो कोटी रुपयांचा फायदा होत होत असतो. चला पाहुया दारूपासून किती महसूल मिळतो.

खरेतर दारू ही राज्याच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. यामुळेच राज्ये दारुच्या दुकानांना परवानगी देण्याची मागणी करत होते. लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसांत हरियाणामध्ये ही दुकाने सुरु ठेवण्यात आली होती. मात्र, टीका होऊ लागल्याने ती बंद करण्यात आली.

राजस्थानच्या एका मंत्र्याने तर दारुमध्ये अल्कोहोल असल्याने घशातील कोरोना मरतो, असा दावाच करून टाकला होता.

देशातील सर्व राज्यांना आणि २ केंद्रशासित प्रदेशांना अबकारी करातून १ लाख ७५ हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला होता. ही आकडेवारी 2019-20 ची आहे. तर 2018-19 मध्ये हाच आकडा दीड लाख कोटी होता.

उत्तर प्रदेशला 2019-20 मध्ये ३५५१७ कोटी, कर्नाटक २०९५० कोटी, महाराष्ट्र १७४७७ कोटी. पश्चिम बंगाल ११८७४कोटी आणि तेलंगानाला १०९०१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. या राज्यांमध्ये सर्वाधिक अबकारी कर आकारला जातो. तर सर्वात कमी गोव्यामध्ये आकारला जातो. याचा फटका महाराष्ट्राला बसतो.

आता लॉकडाऊनमध्ये परवानगी मिळाल्यानंतर काही राज्यांनी किंमतीत मोठी वाढ केली आहे. ४० दिवस दारू न मिळाल्याने तळीरामांच्या उड्या या दुकानांवर पडणार आहे. याचा फायदा आता राज्य सरकारांनी उठविण्यास सुरुवात केली आहे.

आता लॉकडाऊनमध्ये परवानगी मिळाल्यानंतर काही राज्यांनी किंमतीत मोठी वाढ केली आहे. ४० दिवस दारू न मिळाल्याने तळीरामांच्या उड्या या दुकानांवर पडणार आहे. याचा फायदा आता राज्य सरकारांनी उठविण्यास सुरुवात केली आहे.

दिल्लीने दारुवर ७० टक्के विशेष कोरोना फी लावली आहे. तर आंध्र प्रदेस सरकारने दारू ७५ टक्के महाग केली आहे. अन्य राज्येही याच वाटेवर जाण्याची शक्यता आहे.