CoronaVirus Live Updates : सावधान! देशात घातक होतोय कोरोना, Omicron BA.2 चे थैमान; WHO ने चौथ्या लाटेआधी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 02:38 PM2022-04-25T14:38:22+5:302022-04-25T14:54:33+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचे Omicron आणि XE सारखे प्रकार कहर करत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाबाबत इशारा दिला आहे.

भारतात कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2541 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 16,522 झाली आहे. 30 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.

देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,22,223 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात एक हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांकडे कोरोनाची चौथी लाट म्हणून पाहिले जात आहे.

सर्वात आधी लहान मुलांवर हल्ला करणारा कोरोना आता सर्वांनाच विळखा घालत आहे. आशिया आणि युरोपातील अनेक देशांमध्ये चौथी लाट फार पूर्वीच धडकली होती. कोरोना यावेळी पुन्हा जीवघेणा ठरला आहे.

कोरोनाचे Omicron आणि XE सारखे प्रकार कहर करत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाबाबत इशारा दिला आहे. एनबीटीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे.

सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, सध्या भारतासह अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन BA.2 ने थैमान घातले आहे. याशिवाय, XE, BA.4 आणि BA.5 सारखे इतर अनेक प्रकार देखील आढळले आहेत. यापैकी XE प्रकारात सर्वाधिक पसरवण्‍याची क्षमता आहे.

स्वामिनाथन यांनी यावर भर दिला आहे की कोरोना व्हायरस हा एक हवेतून पसरणारा व्हायरस आहे ज्यामध्ये गर्दीच्या जागा धोक्यात आहेत. त्यामुळे जोपर्यंत लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू आहे तोपर्यंत खबरदारी घेणे चांगले आहे.

मास्क परिधान केल्याने जोखीम लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. याशिवाय ज्या लोकांना श्वसनाच्या आजाराची लक्षणे आहेत त्यांनी घरीच राहावे आणि प्रत्येकाने हात धुत राहावे. संसर्ग वाढत असताना सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना कठोर केल्या पाहिजेत.

रोग प्रतिकारशक्ती कालांतराने कमी होते आणि ओमायक्रॉन लसीकरण केलेल्या लोकांना देखील संक्रमित करू शकते. मात्र, कोरोना या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम मार्ग आहे.

गंभीर काळात व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व कोविड नियम पाळणे फार महत्वाचे आहे. डब्ल्यूएचओ तज्ञाने असेही सूचित केले की भविष्यात लॉकडाऊन सारख्या इतर कोणत्याही उपाययोजनांची आवश्यकता नाही, परंतु खबरदारी म्हणून प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा रुग्णसंख्य़ा वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.