Corona Vaccination : भारीच! ड्रोनद्वारे देशातील दुर्गम भागात पोहोचवण्यात येणार 'कोरोना लस'; जाणून घ्या, सरकारचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 08:26 AM2021-06-14T08:26:09+5:302021-06-14T08:45:43+5:30

Corona Vaccination : देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरीचे प्रयत्न करत आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत.

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 17 कोटींचा टप्पा पार केला आहेत. तर आतापर्यंत 3,819,300 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.

भारतात सध्या कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट झालेली पाहायला मिळत आहे. एकूण रुग्णांची संख्या ही दोन कोटींच्या वर गेली आहे.

कोरोनामुळे देशात तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण सुरू असून लाखो लोकांनी लस घेतली आहे.

देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरीचे प्रयत्न करत आहे. याच दरम्यान लसीकरण मोहीम दुर्गम भागात सहज उपलब्ध करुन देण्याच्या योजनेवरही आता सरकार काम करत आहे.

सरकारकडून आता देशातील दुर्गम भागात, जिथे पोहचणं कठीण आहे, अशा ठिकाणी ड्रोनच्या (Drones) मदतीने कोरोना लस (Corona Vaccine) देण्याची योजना आखली जात आहे. आयआयटी कानपूरकडून करण्यात आलेल्या एका संशोधनात हे सांगण्यात आलं आहे.

सध्या देशात कोरोना लस खरेदी करण्याचं काम सरकारी कंपनी एचएचएल (HLL) लाइफकेअर (HLL Lifecare) करत आहे. याची सहाय्यक कंपनी एचएचएल इंफ्रा टेक सर्विसेज लिमिटेडने (HLL Infra Tech Services Limited) इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) देशातील दुर्गम भागात कोरोना लस पोहोचवण्यासाठी 11 जून रोजी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

तेलंगणामध्ये ड्रोनद्वारे कोरोना लस पोहोचवण्याच्या निर्णयावर काम करत आहे. देशातील दुर्गम भागात कोरोना लस पोहोचवण्यासाठी पाहण्यात येणाऱ्या या ड्रोनबाबत ICMR नेदेखील अभ्यास केला आहे.

लसीकरणाच्या कामासाठी अशा ड्रोनचा वापर केला जाईल, जे 35 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतील. तसेच 100 मीटर उंचीपर्यंत उडू शकतील. यासाठी 22 जूनपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत.

आयआयटी कानपूरच्या सहकार्याने ICMR ने यासंदर्भात संशोधन केल्याचं सांगण्यात आलं आहे. यात त्यांनी कोरोना लस ड्रोनच्या माध्यमातून देशाच्या दुर्गम भागात पोहोचवता येऊ शकते का ते पाहण्यात आलं. ICMR ची ही चाचणी यशस्वी ठरली.

ICMR ने ड्रोनद्वारे कोरोना लसीच्या यशस्वी सप्लायसाठी एक स्टँडर्ड प्रोटोकॉल तयार केला आहे. त्याशिवाय आयसीएमआर दुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनचं मॉडेल तयार करण्यावरही काम करत आहे.

ड्रोन चार किलोपर्यंतचं वजन घेऊन उडण्यास सक्षम असतील. लस, सेंटरपर्यंत पोहोचवून तेथून पुन्हा परतण्यासाठीही ड्रोन सक्षम असतील. ड्रोनचं टेक ऑफ आणि लँडिंग DGCA च्या गाइडलाइन्सवर आधारित असेल.

पॅराशूट आधारित डिलीव्हरी सिस्टम असणार नाही. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य खबरदारी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. कोरोना लसीच्या ट्रायलआधीच 50% लहान मुलं कोरोना संक्रमित असल्याची माहिती समोर आली आहे,

लहान मुलांना लवकरात लवकर लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात चिमुकल्यांवर कोरोना लसीची ट्रायल सुरू होणार आहे. पण त्याआधीच याआधीच एम्सने (AIIMS) एक धक्कादायक खुलासा केला आहे.

एम्समध्ये ज्या लहान मुलांवर कोरोना लसीच्या ट्रायलआधी अशी चाचणी घेण्यात आली. त्यापैकी बहुतेक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, अशी माहिती आता स्क्रिनिंगमधून समोर आली.

मुलांच्या पालकांनाही मुलांना कोरोना झाल्याची कल्पना नव्हती. या सर्व मुलांमध्ये मोठ्या लोकांप्रमाणे श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसात संसर्ग, घशात संसर्ग यासारखी कोरोनाची गंभीर लक्षणं नव्हती. तर केवळ सर्दी, खोकला आणि ताप आला होता, असंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.