तीक्ष्ण नाक, कोरीव चेहरा अन्...; महाकुंभातील तरुणीच्या सौंदर्याने जिंकले सर्वांचे मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:17 IST2025-01-17T10:52:37+5:302025-01-17T11:17:20+5:30

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये भव्य महाकुंभाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच अशी काही माणसेही दिसत आहेत त्यांना पाहून संपूर्ण भारत आश्चर्यचकित झाला आहे.

प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात जिथे लाखो लोक त्रिवेणी संगमात आध्यात्मिक जागरणासाठी गेले आहेत तिथे एक अनपेक्षित व्यक्तिमत्वाच्या तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिची काळसर त्वचा, पिवळ्या रंगाचे डोळे, तीक्ष्ण नाक आणि कोरीव चेहरा यासह तिचे सौंदर्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

महाकुंभादरम्यान एका इंस्टाग्राम यूजरने माळा विकणाऱ्या या तरुणीशी संवाद साधला आणि तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. लांब वेणीने बांधलेले केस असलेली ही तरुणी तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे व्हायरल झाली आहे

तिचे आकर्षक फोटो सेल्फी काढण्यासाठी आणि व्हिडिओमध्ये टिपण्यासाठी लोक तिच्याभोवती गर्दी करताना दिसत आहेत. यावेळी एका व्लॉगरने विचारल्यावर तिने सांगितले की ती सोशल मीडियावर देखील आहे आणि इंस्टाग्राम वापरते.

या तरुणीने ती मध्य प्रदेशातील इंदौर येथील रहिवासी असल्याचे सांगितले. ती रुद्राक्षाच्या माळा विकते असेही सांगण्यात आले. मात्र, यावेळी तिने तिचे नाव सांगितले नाही आणि ती निघून गेली.

रुद्राक्षाच्या माळा विकणाऱ्या मुलीची तर मोनालिसाशी तुलना केली जात आहे. महाकुंभला पोहोचलेले लोक तिच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहे. सोशल मीडियावरही ही तरुणी खूप सुंदर दिसत आहे असं लोकही म्हणत आहेत.

रुद्राक्षाच्या माळा विकणाऱ्या या मुलीचे डोळे मॉडेलपेक्षा कमी दिसत नाहीत आणि त्यामुळेच महाकुंभासाठी आलेल्या भाविकांना या तरुणीसोबत सेल्फी काढायला मिळत आहेत. हर्षा रिचारियानंतर ही तरुणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. “ती खूप सुंदर दिसतेय,” “तिचे डोळे मंत्रमुग्ध करणारे आहेत" अशा कमेंटसह असंख्य इमोजी चाहत्यांकडून दिल्या जात आहेत.