नाशिक जिल्ह्यात गारपीट, अवकाळीनं शेतीचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 06:50 PM2021-02-18T18:50:19+5:302021-02-18T18:59:33+5:30

नाशिक- शहरासह जिल्ह्याच्या काही भागात आज बेमोसमी पाऊस आणि गारपीट झाली. सटाणा आणि भगूर येथे गारपीट तर त्र्यंबकेश्वर, सिन्नर, कळवण या भागात दुपारी मुसळधार पाऊस झाला.

नाशिक शहरात सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला असून अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहराजवळ भगुरसह राहुरी दोनवाडे परीसरात गारपीटही झाली.

परिसरातील विटभट्टीच्या कच्चा विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेतकरी यांच्या गहु भाजीपाला पिकांची नुकसान झाल्याचे राहुरी सरपंच संगिता घुगे आणि दोनवाडे सरपंच शैला ठुबे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील काही गावात आज अवकाळी पाऊस झाला. बागलाण तालुक्यात गारांचा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. द्राक्ष, कांदा पिकांचे नुकसान झाले.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून ज्वारीचे पीकाचेही प्रचंड नुकसान झाल्याचं शेतकरी म्हणतात. आताचा पाऊस केवळ शेतकऱ्यांचं नुकसान करणारा आहे.

हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. तसेच, शेतकरी आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं होतं. त्यानंतर, राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे, त्यासोबत गार पडल्याने रस्त्यावर पांढरा बर्फ बडल्यासारखं दिसत होतं

स्थानिक नागरिकांनी गारांसह पडणाऱ्या पावसाचे फोटो काढले आहेत.

अनेकांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह स्ट्रिमींगही केल्याचं पाहायला मिळालं