...जेव्हा सरन्यायाधीश शरद बोबडे क्रिकेट खेळतात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 03:29 PM2020-01-19T15:29:37+5:302020-01-19T15:32:39+5:30

नागपूर हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरतर्फे आयोजित मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी जोरदार फटकेबाजी करत तीन चौकार फटकारले.

त्यांनी 30 बॉल खेळून 18 धावा काढल्या. हा सामना व्हीसीए स्टेडियम येथे झाला.

हा मैत्रीपूर्ण सामना दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षी त्यात सरन्यायाधीश शरद बोबडे खेळल्याने अधिक रंगत आली.

याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांच्यासह इतर सर्व न्यायमूर्ती उपस्थित होते.

सामन्यानंतर बोलताना न्या. शरद बोबडे यांनी नागपुरात येऊन हा सामना खेळल्यामुळे आनंद झाल्याची भावना व्यक्त केली.

तसेच त्यांनी बार असोसिएशनचे आभार मानले . नागपूरला येणे नेहमीच आनंददायक असते असेही ते म्हणाले.