शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'हायवे हिप्नोसिस' काय आहे? राष्ट्रीय महामार्गांवर का होत आहेत जीवघेणे अपघात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 19:19 IST

1 / 4
अपघातांची कारणे काय ? : संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमुख कारण अतिवेग हे आहे. ताशी १२० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित केलेली असूनही, वाहने वारंवार ही मर्यादा ओलांडून ताशी १२० किमीपेक्षा जास्त वेगाने धावतात.
2 / 4
'हायवे हिप्नोसिस'चा धोका : महामार्गावर सतत सरळ रस्त्यावर वाहन चालवल्याने एकाग्रता कमी होते. चालक अर्धवट झोपेच्या अवस्थेत जातो. यालाच 'हायवे हिप्नोसिस' म्हणतात. त्यामुळे सतत वाहन चालविताना काही अंतरावर थोड्या वेळासाठी आराम करणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे अपघातांचा धोका कमी होऊ शकतो.
3 / 4
प्रवासात डुलकी आणि थकवा धोकादायक : लांब प्रवासात चालकांना थकवा जाणवतो. डुलकी लागल्याने नियंत्रण सुटते व अपघात घडतात. त्यामुळे लांब प्रवासात जाताना विशेष काळजी घ्यावी.
4 / 4
वेगाचा मोह, शिस्तीचा अभाव ठरतोय जीवघेणा : वेगमर्यादा ओलांडणे, हे अपघातांचे प्रमुख कारण आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होत आहे. शिस्तीचा अभाव जीवावर बेतत आहे.
टॅग्स :highwayमहामार्गSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र