Photo's: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ९० च्या दशकातील 'त्या' फोटोंनी जागवल्या आठवणी! काम सुरु होते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 20:16 IST2026-02-05T20:07:55+5:302026-02-05T20:16:17+5:30
Mumbai Pune Expressway Old Work Viral Photo's: ९० च्या दशकात ७ तास लागणारा प्रवास आता अवघ्या दोन-तीन तासांवर आला आहे. तेव्हा हा महामार्ग बांधला नसता तर... पहा तेव्हाच्या बांधकामाचे फोटो...

सोशल मीडियावर सध्या ९० च्या दशकातील मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या बांधकामाचे काही दुर्मिळ फोटो व्हायरल होत आहेत.

एकेकाळी 'सिंगल लेन'च्या जुन्या हायवेवर ७-८ तास अडकून पडणाऱ्या प्रवाशांसाठी हा एक्सप्रेसवे म्हणजे एक वरदान ठरला होता.

पण कालच्या टँकर अपघातानंतर ३० तास बंद पड़ल्याने आता हाच मार्ग 'नेक्स्ट जनरेशन' प्रवासासाठी सज्ज करण्याची मागणी केली जात आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा याच प्रगतीचा जिवंत पुरावा आहे. ९० च्या दशकात सुरू झालेलं हे स्वप्न आता 'मिसिंग लिंक' प्रकल्पाद्वारे अधिक वेगवान होणार आहे.

लोणावळा-खंडाळा घाटातील ट्रॅफिकपासून सुटका करण्यासाठी आशियातील सर्वात रुंद बोगदे बांधले जात आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ आणखी २०-२५ मिनिटांनी कमी होईल.

संपूर्ण मार्गावर हाय-टेक कॅमेरे आणि एआय (AI) द्वारे देखरेख ठेवली जाणार आहे, ज्यामुळे अपघात कमी होऊन सुरक्षितता वाढेल.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स आणि प्रगत सोयीसुविधांनी हा मार्ग सज्ज होत आहे.

असे असले तरी सध्याचा वाहन कंपन्यांचा महिन्याला चार लाख वाहनांचा खप पाहता लवकरच आणखी एका स्वतंत्र मार्गाची गरज पडणार आहे. (फोटो : साभार इंटरनेट, अज्ञात फोटोग्राफर)

















