नववर्षी स्वच्छतेचा वसा! रोहित पवारांनी मतदार संघात केली स्वच्छता

By मोरेश्वर येरम | Published: January 1, 2021 04:31 PM2021-01-01T16:31:01+5:302021-01-01T16:36:26+5:30

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदार संघात स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदार संघात स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला.

कर्जत-जामखेडने स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आज आमदार रोहीत पवार यांनीही पुढाकार घेऊन आरोळे रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता केली.

जामखेडच्या आरोळे रुग्णालयानं कोरोना काळात मोठं योगदान दिलं आहे. रुग्णालय प्रशासनाने बजावलेल्या कर्तव्याची जाण ठेवत स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतल्याचं रोहित यांनी म्हटलंय.

स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत या रुग्णालयात नागरिक, युवा मित्र, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला भगिनी, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत श्रमदान करुन परिसरात स्वच्छता केली, अशी माहिती रोहित यांनी दिली आहे.

आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही स्वच्छता सर्वेक्षणात भाग घेतला आहे. त्यांनीही याआधी स्वच्छता मोहीमेत हिरीरीने भाग घेतला होता.

जामखेडमध्ये स्वच्छा मोहीमेत सहभाही होण्याआधी कर्जतमध्येही रोहित पवार यांनी वृक्षारोपण करुन नववर्षाचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं.