Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 23:33 IST2025-04-30T19:21:47+5:302025-04-30T23:33:52+5:30
Maharashtra Day 2025 Wishes in Marathi: भारतात राज्य अनेक आहेत, पण सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या सबळ राज्य कोणते असेल तर ते म्हणजे महाराष्ट्र राज्य! १ मे १९६० रोजी तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली, म्हणून हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त शुभेच्छा देताना मित्र परिवारासोबत ही आकर्षक शुभेच्छा पत्र शेअर करायला विसरू नका.

Happy Maharashtra Day Wishes in Marathi
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
Happy Maharashtra Day Wishes in Marathi
बहु असोत सुंदर संपन्न कीं महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
स्वराज्यतोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे !
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती !
ही भूमी महाराष्ट्राची, शेतकऱ्यांची, कामगारांची इथे हो बुद्धिमंत रमले, श्रमिक हो एकसंघ झाले गाऊया एकजुटीचा मंत्र सारे हो !
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा