काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 18:48 IST2025-08-23T17:35:01+5:302025-08-23T18:48:35+5:30

मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवरुन फसवणकीच्या घटना समोर येत आहेत.

काही दिवसापूर्वी लग्नपत्रिकेच्या मेसेजवर क्लिक केल्यानंतर खात्यावरुन २ लाख रुपये उडाल्याचे समोर आले.

मागील काही दिवसापासून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगार तुमच मोबाईल क्लोन करुन ही फसवणूक करतात. यासाठी तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करतात. त्या मेसेजवर क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल क्लोन होतो.

हिंगोलीतून अशीच एक घटना समोर आली. एका व्यक्तीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर लग्न पत्रिकेचा मसेज आला. त्या व्यक्तिला लग्नपत्रिका मिळाली. मेसेजमध्ये कार्ड सामान्य दिसत होते. पण त्यावर क्लिक करताच त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून सुमारे २ लाख रुपये गायब झाले.

सायबर फसवणुकीचा बळी ठरलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला ३० ऑगस्ट रोजी लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण एका अज्ञात क्रमांकावरून मिळाले होते. त्यावर लिहिले होते, तुमचे स्वागत आहे. लग्नाला नक्की या. त्यासोबत एक पीडीएफ फाइल देखील जोडण्यात आली होती.

ही पीडीएफ फाइल अँड्रॉइड अॅप्लिकेशन पॅकेज (APK) फाइल होती. ही फाईल आपला मोबाईल हॅक करण्यासाठी वापरली जाते.

या मेसेजमध्ये लग्नाचे कार्ड दाखवून त्याचा संवेदनशील डेटा चोरण्यासाठी वापरली जात होती. पीडितेने फाइलवर क्लिक करताच, सायबर गुंडांनी डेटामध्ये प्रवेश केला आणि १,९०,००० रुपये चोरले.

हिंगोली पोलिस स्टेशन आणि सायबर सेल विभागात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी लग्नाच्या निमंत्रण पत्रांमध्ये अनेकांचे पैसे बुडाले तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला होता.

या फसवणुकीला सुरुवात तुमच्या व्हॉटसअॅपर लग्नाची निमंत्रण पत्रिका मिळाल्यानंतर सुरू होते. त्या मसेजवर क्लिक केल्यानंतर, फोनवर APK फाइल्स डाउनलोड केल्या जातात.

त्यानंतर सायबर गुन्हेगार पीडितेच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतात. ते फोनचा मालक असल्याचे भासवून पैसे मागण्यासाठी फोनमध्ये असलेल्या डेटाचा वापर देखील करू शकतात.