अशोक खरातकडे चार सीमकार्ड! एक खास महिलांसाठी, तर दुसरे व्हीआयपींसाठी; SITच्या चौकशीत खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:25 IST2026-04-01T16:18:28+5:302026-04-01T16:25:27+5:30

Ashok Kharat Case Latest update: अशोक खरात प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून केला जात आहे. खरातची चौकशी करण्यात आल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या आहेत.

अशोक खरातने १५० पेक्षा जास्त महिलांवर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून, तपासातून तो चार सीम कार्ड वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक खरात याने एसआयटी चौकशीत चार मोबाईल क्रमांक वापर असल्याचे आणि सर्व मोबाईल क्रमांक वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापरले जात होते. अशोक खरात वापरत असलेल्या चार मोबाईल क्रमांकापैकी एक व्हीव्हीआयपी लोकांशी संपर्क करण्यासाठीच होता.

अशोक खरात एक मोबाईल क्रमांक फक्त महिला अनुयायांशी संपर्क करण्यासाठीच वापरत होता. तिसरा मोबाईल क्रमांक हा पैशांची देवाण-घेवाण, इतर आर्थिक व्यवहारांसाठी वापरत होता. खरातने जो चौथा मोबाईल क्रमांक वापरायचा तो सामान्य लोकांसाठी होता.

व्हीव्हीआयपींमध्ये मोठे राजकारणी, मोठे उद्योगपती, प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी यांचा समावेश होता. या सगळ्यांचे मोबाईल क्रमांक खरातने कोडवर्ड वापरून सेव्ह केलेले आहेत. प्रशासनातील अनेक अधिकारी अशोक खरातकडे जायचे असेही आता समोर आले आहे.

अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे हे मूळ प्रकरण आहे. त्यामुळे शरीरसंबंध ठेवल्यानंतर या महिला गर्भवती होणार नाही, यासाठी खरात काय करायचा? याचा तपास सध्या सुरू आहे. खरात यांच्यासाठी डॉक्टरांच्या संपर्कात राहायचा का आणि यात कोणते डॉक्टर आहेत का? याचाही तपास एसआयटी करत आहे.