टेक ऑफ करण्यापूर्वीच चेष्टा बिश्नोईने घेतला जगाचा निरोप; मृत्यूनंतर ५ जणांना दिलं जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:05 IST2024-12-19T16:58:14+5:302024-12-19T17:05:27+5:30
Cheshta Bishnoi Death : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील ट्रेनी पायलट चेस्ता बिश्नोईचे स्वप्न पूर्ण होणार होते. ती आकाशावर राज्य करणार होती. मात्र त्यापूर्वीच तिने हे जग सोडले.

दहा दिवसांपूर्वी पुणे-बारामतीला जोडणाऱ्या रस्त्यावर एक एसयूव्ही झाडावर आदळली होती. यामध्ये दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला. तर या घटनेत अन्य दोघे जखमी झाले. यामध्ये राजस्थानमधील पोखरण येथील रहिवासी चेष्टा बिश्नोई यांचा समावेश होता.
अपघातानंतर २१ वर्षीय चेष्टा कोमात गेली होती. मात्र चेष्टाचे मंगळवारी पुण्यातील रुग्णालयात निधन झाल्यानंतर बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी चेष्टाचे अवयवदान करून कुटुंबीयांनी मोठं मन दाखवलं आहे.
चेष्टाचा जन्म ५ डिसेंबर २००३ रोजी झाला होता. अशात वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी चेष्टाचे दुःखद निधन झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे.
राजस्थानची चेष्टा वर्षभरापूर्वी पायलट प्रशिक्षणासाठी पुण्याला आली होती. मित्रांसोबत फिरायला गेघालेली चेष्टा पायलट होण्याच्या मार्गावर होती. चेष्टाने निर्धारित २०० तासांपैकी ६८ तासांचे उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केले होते. मात्र त्याआधीच चेष्टाने जगातून एक्झिट घेतली.
चेष्टाच्या भावाने सांगितले की, चेष्टाचे हृदय, यकृत, दोन्ही किडनी, स्वादुपिंड यांसारखे अवयव दान करण्यात आले आहेत. यामुळे पाच जणांना नवजीवन मिळणार आहे.
या अपघातात तक्षू शर्मा आणि आदित्य कणसे यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा सिंग आणि चेष्टा बिश्नोई हे गंभीर जखमी झाले होते. मंगळवारी चेष्टाचाही मृत्यू झाला.