बिल गेट्स यांच्या घटस्फोटासाठी या महिलेला धरलं जात आहे जबाबदार, तिने दिली यावर प्रतिक्रिया...

Published: May 7, 2021 04:24 PM2021-05-07T16:24:04+5:302021-05-07T16:31:34+5:30

Bill Gates Divorce : ज्हे शेली वान्ग ३६ वर्षांची असून ती चीन सोडून अमेरिकेत आली होती. ती सध्या सियाटल शहरात राहते आणि ती अविवाहित आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी नुकतीच घोषणा केली की, ते पत्नी मेलिंडा गेट्सपासून घटस्फोट घेत आहेत. अजूनतरी या बहुचर्चीत घटस्फोटाचं कारण समजू शकलं नाही. मात्र, एका महिलेचं नाव समोर येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महिला बिल आणि मेलिंडा यांच्या घटस्फोटाचं कारण आहे.

अनेक ऑनलाइन अफवांनुसार, बिल आणि चीनची राहणारी महिला ज्हे शेली वान्ग यांचं कथितपणे अफेअर सुरू आहे. या अफवा वाढल्यावर वान्ग स्वत: समोर आल्या असून त्यांनी चीनची लोकप्रिय वेबसाइट वाईबूवरून आपली बाजू मांडली आहे. त्यांनी या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.

वॉन्ग यांनी चीनच्या मंदारिन भाषेत लिहिले की, मला वाटलं होतं की, या अफवा आपोआप थांबतील. कारण यांना काहीच आधार नाही. पण हे माहीत नव्हतं की, या अफवा इतक्या जास्त वाढतील. मला त्या सर्वांचे आभार मानायचे आहे ज्यांनी मला या कठिण काळात साथ दिली आणि या अफवा थांबवण्यास मदत केली.

ज्हे शेली वान्ग ३६ वर्षांची असून ती चीन सोडून अमेरिकेत आली होती. ती सध्या सियाटल शहरात राहते आणि ती अविवाहित आहे. ती एक प्रोफेशनल ट्रान्सलेटर आहे आणि ती गेट्स फाउंडेशनसोबत येल स्कूल मॅनेजमेंट व हॉर्वर्ड बिझनेस स्कूलसाठीही काम करते.

वान्गने ब्रिगहम यंग यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं आणि तिला मंदारिन, इंग्रजी आणि केंटोनेस भाषा येतात. रिपोर्ट्सनुसार, तिने गेट्स फाउंडेशनसोबत फ्रीलान्सर म्हणून काम केलं होतं. त्यासोबतच तिने कोरोना काळाआधीपर्यंत तीन अमेरिका आणि शांघायच्या फ्लाइटमध्येही काम केलं आहे.

वान्गची मैत्रीण ली हिने यासंबंधी एक ब्लॉग पोस्टही लिहिली होती. त्याने लिहिले होते की, वान्ग माझी जुनी सहकारी आणि मैत्रीण आहे. ती एक अशी महिला आहे जिच्याकडून मी खूप प्रेरणा घेतो. मी कधी विश्वासही ठेवू शकत नाही की, ती दुसऱ्या लोकांच्या वैवाहिक जीवनात लुडबूड करण्याचा प्रयत्न करू शकते.

याबाबत वान्गची मैत्रीण ली असंही म्हणाली की, वान्ग फार महत्वाकांक्षी आहे आणि ती वेगवेगळ्या प्रकारची कामे करून स्वत:ला खूश करते. तिने वर्षाआधी पायलट लायसन्सही मिळवलं होतं. तिने पायलटचं ट्रेनिंगही पूर्ण केलंय.

बिल गेट्स यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर टाइम मॅगझिनमधील एका आर्टिकल व्हायरल झालं होतं आणि त्यातूनच त्यांच्या पर्सनल लाइफबाबत अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. या आर्टिकलमध्ये लिहिले होते की बिल गेट्स यांनी त्यांच्या पत्नीसोबत अजब करार केला होता.

या करारानुसार, बिल गेट्स दरवर्षी त्यांची एक्स गर्लफ्रेन्ड एन विनब्लेडला भेटण्यासाठी एका सीक्रेट बीचहाऊसवर जात होते. न्यूयॉर्क पोस्टने नुकतेच या सीक्रेट बीचहाऊसचे फोटो जारी केले होते. रिपोर्टनुसार, हे बीचहाऊस एनचं आहे आणि हे लोकेशन लोकांमध्ये चांगलंच पॉप्युलर आहे.

Read in English