टायटॅनिक जहाजाला आजपर्यंत समुद्रातून बाहेर का काढलं नाही? जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 05:02 PM2021-10-02T17:02:46+5:302021-10-02T17:14:50+5:30

लोकांना माहीत आहे या जहाजाचा मलबा कुठे आहे. पण आजही हा मलबा समुद्रातून बाहेर काढण्यात आला नाही. पण असं का? का हा मलबा बाहेर काढला नाही? चला जाणून घेऊ याचं उत्तर.

टायटॅनिक जहाजाबाबत तुम्ही खूपकाही ऐकलं आणि वाचलं असेल. आम्ही सिनेमाबाबत नाही तर खऱ्या टायटॅनिकबाबत बोलत आहोत, ज्यावर सिनेमा आला होता. जगातलं सर्वात मोठं जहाज म्हणून विख्यात टायटॅनिक जहाज बुडण्याला आता १०८ पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. लोकांना माहीत आहे या जहाजाचा मलबा कुठे आहे. पण आजही हा मलबा समुद्रातून बाहेर काढण्यात आला नाही. पण असं का? का हा मलबा बाहेर काढला नाही? चला जाणून घेऊ याचं उत्तर.

टायटॅनिक १० एप्रिल १९१२ ला आपल्या पहिल्या प्रवासावर ब्रिटनच्या साउथॅम्पटन बंदरातून न्यूयॉर्कसाठी निघालं होतं. पण १४ एप्रिल १९१२ ला उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमखंडाशी टक्कर झाल्याने टायटॅनिकचे दोन तुकडे झाले होते आणि याचा मलबा ३.८ किलोमीटर खोल जाऊन पडला होता.

या दुर्घटनेत साधारण १५०० लोक मारले होते. या दुर्घटनेला त्यावेळची सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते. जवळपास ७० वर्षांपर्यंत या जहाजाचा मलबा स्पर्शाविना समुद्रात पडून होता. पहिल्यांदा १९८५ मध्ये टायटॅनिकचा मलबा शोधकर्ता रॉबर्ट बलार्ड आणि त्यांच्या टीमने शोधून काढला.

हे जहाज जिथे बुडालं होतं तिथे खूप अंधार आहे आणि समुद्राचं तापमान एक डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. आता इतक्या खोलात एखाद्या व्यक्तीने जाणं आणि पुन्हा सुरक्षित परत येणं फार अवघड काम आहे. अशात जहाजाचा मलबा आणण्याचा विचार तर दूरच आणि तसंही जहाज इतकं मोठं व जड होतं की, जवळपास ४ किलोमीटर खोलात जाऊन मलबा वर घेऊन येणं अशक्य आहे.

असं सांगितलं जातं की, समुद्राच्या आता टायटॅनिकचा मलबा आता जास्त काळ टिकूही शकणार नाही. कारण तो वेगाने पाण्यात मिश्रित होत आहे. तज्ज्ञांनुसार, येणाऱ्या २० ते ३० वर्षात टायटॅनिकचा मलबा पूर्णपणे गायब होईल आणि समुद्राच्या पाण्यात विलीन होईल.

समुद्रातील आढळणारे बॅक्टेरिया जहाजाचा बराच भाग कुरतडत आहेत. ज्यामुळे त्याला जंग लागत आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, जंग निर्माण करणारे बॅक्टेरिया रोज साधारण १८० किलो मलबा खातात. हेच कारण आहे की, तज्ज्ञ म्हणतात की, टायटॅनिकचं आयुष्य आता जास्त राहिलं नाहीये.