आकाशात उडत असलेल्या विमानामागे दोन पांढऱ्या लाईन्स का दिसतात, त्याना नेमकं काय म्हणतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:21 IST2026-01-01T11:18:09+5:302026-01-01T12:21:54+5:30
Interesting Facts : विमानातून निघणाऱ्या या पांढऱ्या लाईन्सबाबत वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असतात. पण या लाईन्स म्हणजे काही जादू किंवा चमत्कार नाहीत.

Interesting Facts : आपण अनेकदा पाहिलं असेल की, आकाशातून एखादं विमान जाताना दिसलं तर त्यामागे दोन पांढऱ्या लाईन्सही दिसतात. या लाईन्स काही वेळानंतर गायब झाल्याचंही बघायला मिळतं.

विमानातून निघणाऱ्या या पांढऱ्या लाईन्सबाबत वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असतात. पण या लाईन्स म्हणजे काही जादू किंवा चमत्कार नाहीत.

या पांढऱ्या लाईन्सना कंट्रेल्स नावानेही ओळखलं जातं. या लाईन्स इंजिनातील धूर, हवेतील तापमान आणि ओलावा यामुळे तयार होतात.

आपल्या वाचून आश्चर्य वाटेल की, या पांढऱ्या लाईन्स बर्फाचे छोटे छोटे क्रिस्टल किंवा पाण्याच्या थेंबापासून तयार होतात. या लाईन्स कधी लवकर गायब होतात, तर कधी जास्त वेळ टिकून राहतात.

जेव्हा विमान पृथ्वीपासून ८ हजार फूट उंचावर उडत असतं, तेव्हा या लाईन्स तयार होतात. या उंचीवर हवा फार थंडी -४० डिग्री सेल्सिअस इतकी असते.

अशात विमानातून एक्झॉस्ट बाहेर पडतं आणि आकाशातील ओलावा या एरोलसॉल्ससोबत मिळून कंट्रेल्स तयार करतं.

प्रत्येक कंट्रेल्स एकसारखे नसतात, कधी ते जास्त वेळ तसेच राहतात तर कधी काही मिनिटांमध्ये गायब होतात.

कंट्रेल्स जेव्हा जास्त प्रमाणात तयार होतात, तेव्हा ते सूर्यकिरणं रोखू शकतात. यामुळे ग्लोबल वार्मिंग आणि तापमानात बदल होऊ शकतो.
















