इराणच्या सैन्यात अवाक् करणारं आहे महिलांचं प्रमाण, आकडा बघाल तर बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:51 IST2026-03-03T11:43:05+5:302026-03-03T11:51:43+5:30

Iranian Women Soldier : इराणी सेनेत महिलांचा सहभाग हैराण करणारा आहे. अशात इराणच्या सेनेत किती टक्के महिला सैनिक आहेत आणि त्यांची खासियत काय हे जाणून घेऊया.

इस्त्राइल आणि इराणमधील तणाव चांगलाच वाढला आहे. दोन्हीकडून मोठे हल्ले होत आहेत. इराणच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. इस्त्राइलने देशात इमरजन्सी जाहीर केली आहे. दरम्यान इराणने मागे न हटता सुप्रीम नेते खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्याचा निश्चय केलाय. दरम्यान इराणी सेनेत महिलांचा सहभाग हैराण करणारा आहे. अशात इराणच्या सेनेत किती टक्के महिला सैनिक आहेत आणि त्यांची खासियत काय हे जाणून घेऊया.

इराणमधील The National Liberation Army म्हणजे N.L.A. मध्ये सैनिक विना कोणत्याही रँकशिवाय राहतात, सामूहिक पद्धतीने राहतात आणि त्यांना पगार मिळत नाही. ते पूर्णपणे देशाप्रति समर्पित असतात आणि शपथ घेतात की, जोपर्यंत इराण मुक्त होत नाही, ते लग्न करणार नाहीत. त्यांचं नेतृत्व मरियम राजवी करते, त्यांचे विचार आणि नेतृत्वात महिलांना सेनेत महत्वपूर्ण अधिकार आणि कमांडिंग भूमिका मिळतात. ही संघटना विरोधकांची असते. ही संघटना पीपल्स मुजाहिदीन ऑर्गेनाइजेशन ऑफ ईरान (MEK) ची सशस्त्र शाखा आहे.

N.L.A. च्या महिलांना प्रशिक्षण तर दिलं जातंच, सोबतच त्या टँकही चालवतात. लढाऊ हेलीकॉप्टरही उडवतात आणि काही बटालियनचं नेतृत्वही करतात. पुरूष सैनिक सुद्धा महिलांची क्षमता आणि सैन्य कौशल्याचा सन्मान करतात. इथे महिलांना युद्ध आणि रणनीतीमध्ये समान अधिकार आहेत, जे पारंपारिक इराणी समाजात अशक्य मानलं जातं.

N.L.A. संघटना नेहमीच इराणच्या मौलवी शासनाच्या विरोधात तयार असते. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी १०० पेक्षा जास्त सीमेपलिकडे ऑपरेशन केले. त्यावर इराणने रॉकेट आणि दहशतवादी हल्ले करून उत्तर दिलं. या संघटनेचा उद्देश सामाजिक विरोधासोबत मिळून मौलवी सरकार बदलणं हा आहे.

इराणमधील महिलांसाठी ही संघटना केवळ सेना नाही तर अधिकार आणि सन्मानाचं प्रतीक बनली आहे. बटूल आणि त्यांच्या हजारो सहकारी महिलांना समानता आणि नेतृत्वाचा भूमिका मिळाली आहे. हे आंदोलन स्पष्ट करतं की, इराणमध्ये महिला आता मागे नाहीत. त्या युद्ध आणि नीति निर्माणातही समान भागीदार आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रीय मुक्ती सेनेत ३० हजार सैनिक आहेत, त्यात ३५ टक्के महिला आहेत आणि अधिकारी पदांवर महिलांची भागीदारी ७० टक्के आहे. हे प्रमाण पारंपारिक सेनेच्या तुलनेत फार जास्त आहे आणि यातून महिलांची महत्वाची भूमिका दिसते.