जमिनीखाली वसलंय अख्ख शहर; सिनेमागृह आणि हॉटेलसह आहेत विविध सुविधा, पाहा फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 03:39 PM2021-10-20T15:39:31+5:302021-10-20T15:42:19+5:30

Underground village Coober Pedy: या अंडरग्राउंड गावामध्ये अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या शूटींग झाल्या आहेत.

तुम्ही आतापर्यंत अनेक भूमिगत घरे आणि लष्कराचे बंकर पाहिले असतील किंवा त्याबद्दल ऐकलं असेल. पण, पृथ्वीवर एक असं शहर आहे, जे पूर्णपणे जमिनीखाली वसलेलं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ऑस्ट्रेलियातील एक अख्ख गाव जमिनीखाली स्थिरावलेलं आहे. या गावातील जवळपास सगळे लोक जमिनीखाली राहतात.

कूबर पाडी असं या शहराचं नाव आहे. या शहराला जगातील अनोखे गाव म्हणता येईल. येथील सुमारे 70-80 टक्के लोकसंख्या जमिनीखाली राहते. जमिनीखाली राहूनही हे लोक आलिशान आयुष्य जगतात. या लोकांनी जमिनीखाली मोठ-मोठे घरे बांधली आहेत.

ब्रिटिश न्यूज वेबसाईट डेलीमेलनुसार, येथील रहिवाशांनी भूमिगत गावात फक्त घरेच नाही, तर कार्यालयांसह त्यांचे व्यवसायही आहेत. याशिवाय, गावात भूमिगत चर्च, सिनेमा हॉल, संग्रहालये, आर्ट गॅलरी, एक बार आणि हॉटेल देखील आहेत.

या शहरात ओपलची खडक आहेत, हा खडक येथूनच संपूर्ण जगाला निर्यात केला जातो. एकट्या कूबर पेडीमध्ये 70 हून अधिक ओपल फील्ड आहेत आणि हे जगातील ओपल मायनिंगसाठी सर्वात मोठे क्षेत्र आहे.

येथील बहुतांश भूमिगत यंत्रणा खाणी लक्षात घेऊन बनवल्या गेल्या आहेत आणि कामगार त्यामध्येच अतिरिक्त खोल्या बनवून राहतात. येथे जमिनीखाली बांधलेली घरे पूर्णपणे सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त आहेत.

या परिसरात सुमारे 1500 भूमिगत घरे आहेत, ज्यात 3500 पेक्षा जास्त लोक राहतात. या घरांना डग आऊट म्हणतात. या घरात उन्हाळ्यात एसीची गरज नाही ना हिवाळ्यात हिटरची. भूमिगत असल्यामुळे येथील तापमान नेहमी नॉर्मलवर राहतं.

ही भूमिगत घरे जगभरातील लोकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. अनेक हॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. 'पिच ब्लॅक' चित्रपटाच्या शूटिंगनंतर या चित्रपटातील स्पेसशिप येथेच सोडून देण्यात आलं आणि ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.