जगातील सगळ्यात सुंदर महिलांच्या यादीत भारतीय स्टारला स्थान, नाव वाचून व्हाल चकीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 17:26 IST2025-06-05T15:38:27+5:302025-06-05T17:26:42+5:30

World's Most Beautiful Women's : इंटरनॅशनल लेव्हलवर तयार करण्यात आलेल्या ब्यूटी लिस्टमध्ये सायंटिफिक फॅक्टर्स जसे की, चेहऱ्याची बनावट, संतुलन आणि गोल्डन रेशिओला सगळ्यात जास्त महत्व देण्यात आलं आहे.

जगातील सगळ्यात सुंदर महिलांच्या यादीत यावेळी भारतातील एका स्टारनं जागा मिळवली आहे. कदाचित तिचं नाव वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. इंटरनॅशनल लेव्हलवर तयार करण्यात आलेल्या ब्यूटी लिस्टमध्ये सायंटिफिक फॅक्टर्स जसे की, चेहऱ्याची बनावट, संतुलन आणि गोल्डन रेशिओला सगळ्यात जास्त महत्व देण्यात आलं आहे. जगभरातील अनेक सुंदरींना मागे सोडत भारतातील या अभिनेत्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गोल्डन रेशिओ स्कोरनुसार, जोडी कॉमरला 94.51 टक्के स्कोरसोबतच जगातील सगळ्यात सुंदर महिला मानण्यात आलं आहे. जोडी मेरी कॉमर एका ब्रिटिश अभिनेत्री आहे, तिनं तिचं करिअर 2008 मध्ये टीव्ही शो 'द रॉयल टुडे' च्या एका एपिसोडमधून केली होती. आता ती एक मोठी स्टार आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध सिंगर आणि अभिनेत्री जेंडायाचा स्कोर 94.37 टक्के इतका आहे. कमी वयातच ती फेमस झाली. तिच्या शानदार अभिनयासाठी तिला दोन प्राइमटाईम एमी अवॉर्ड आणि एक गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला आहे.

बेयोन्से एक अमेरिकन सिंगर, गीतकार, अभिनेत्री आणि एक बिझनेस वुमल आहे. सगळ्यात जास्त ऐकल्या जाणाऱ्या सिंगरपैकी ती एक आहे. तिच्या सुंदरतेनं आणि सोबतच टॅलेंटनं तिला ग्लोबल स्टार बनवलं आहे.

एरियाना ग्रांडेचा स्कोर 91.81 टक्के आहे. ती एक सिंगर, गीतकार आणि अभिनेत्री आहे. आपल्या खास आवाजासाठी ती ओळखली जाते. तिची स्टाइल आणि आवाज जगभरात फेमस आहे.

मॉडल आणि अभिनेत्री किम कार्दिशिआनं या जगातील सगळ्यात सुंदर महिलांच्या यादीत 8वं स्थान मिळवलं आहे. त्यानंतर भारतीय अभिनेत्रीचा नंबर आहे.

आता या जगातील सुंदर महिलांच्या यातील बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा नंबर लागला आहे. दीपिकाचा स्कोर या यादीत 91.22 टक्के आहे. ती आपली सुंदरता, परफेक्ट फीचर्स आणि आत्मविश्वास यामुळे या यादीत आली आहे. जगातल्या सगळ्यात सुंदर महिलांच्या यादीत दीपिकानं 9 व्या स्थानी जागा मिळवली आहे.