समुद्र किनारी सापडली रहस्यमय बाटली; आतील गोष्टी पाहून संशोधक उघडायलाही घाबरतात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 02:16 PM2023-11-29T14:16:43+5:302023-11-29T14:19:40+5:30

समुद्राचं असं वैशिष्टे आहे की ते कधीही मानवनिर्मित कचरा अथवा अन्य गोष्टी स्वत:च्या पोटात ठेवत नाही. एक ना एक दिवस ते सगळे लाटांसोबत बाहेर किनाऱ्यावर फेकले जाते. याचमुळे अनेकदा जगात दूर समुद्र किनारी अशा जुन्या गोष्टी अथवा वस्तू सापडतात जे प्रत्येकाला हैराण करणारे वाटेल. अलीकडेच टेक्सासमध्ये असेच काही पुन्हा एकदा घडले आहे.

येथे समुद्र किनारी रहस्यमय चुडेलची बॉटल वाहून आली आहे ज्याला संशोधक उघडण्यापासून घाबरत आहे. सर्वात आधी विशेषज्ञ जैस टनेलची नजर १५ नोव्हेंबरला टेक्सासच्या कॉर्पस क्रिस्टीजवळ असलेल्या समुद्र किनारी या बॉटलरवर पडली

जैस टनेलनं या बॉटलला डायन बॉटल म्हटलं आहे. कारण त्यात लाकडी पाने आणि काही अशा वनस्पती आहेत ज्या कुणी आणि कशासाठी पाण्यात टाकल्या आहेत त्याबद्दल प्रत्येकाला ठाऊक असेल असं नाही.

एका बाटलीत काचेभोवती गुंडाळलेले गोसेनेक बार्नॅकल्स होते ज्यामुळे ही बॉटेल दिर्घकाळापासून पाण्यात बुडलेली असावी असा अंदाज तज्ज्ञांना वाटत आहे. टनेलनं फॉक्स न्यूजला सांगितलं की, २०१७ पासून आतापर्यंत अशाप्रकारे ८ बॉटल किनाऱ्यावर पाण्याच्या लाटेने वाहून आल्या आहेत.

ही बॉटेल उघडण्यास घाबरत नाही. परंतु यात काही मंत्र आणि शापित गोष्टी असल्याची अफवा ऐकायला मिळते त्यामुळे ती उघडण्याची जोखीम घेणार नाही असं टनेल यांनी म्हटलं. त्याचसोबत त्यांच्या पत्नीने ही बॉटल घरी आणण्यासही मनाई केली आहे.

ब्रिटनमध्ये अशा बाटल्या सापडणे ही नवीन बाब नाही. अलीकडच्या काळात जवळपास २०० बाटल्या सापडल्या आहेत ज्यातील काही निर्जन स्थळावरच्या आहेत. ज्या लोकांनी ही बाटली उघडण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यातून नखे, शरीरातील काही द्रव्यपदार्थही सापडले आहेत.

मॅकगिल यूनिवर्सिटी ऑफिस ऑफ सायन्सनं म्हटलं की, १६ आणि १७ व्या शतकांत कथित डायन त्यांच्या मंत्राने आजार आणि वाईट नजर दूर करू शकते असं मानले जायचे. एखाद्या नकारात्मक गोष्टी विच बाटलीत अडकवून बंद केल्या जाऊ शकतात असं ते म्हणाले.

परंतु जर ही बाटली कुणी उघडली तर त्याच्यमागे पीडा लागू शकते असं म्हटलं जाते. एका युट्यूब क्लिपमध्ये टनेल यांनी म्हटलं की, काही अन्य कारणामुळे अशा बाटल्या बनवल्या जात नाहीत असा दावा त्यांचा आहे.