रहस्यमय! इजिप्तमध्ये सापडली सोन्याची जीभ असलेली ममी, जाणून घ्या सोन्याची जीभ असण्याचं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 10:33 AM2021-02-03T10:33:47+5:302021-02-03T10:43:15+5:30

सोन्याची जीभ असलेली ममी इजिप्तमधील प्राचीन भाग तापोसिरिस मॅग्नामध्ये सापडली आहे. हा ममी साधारण २ हजार वर्ष जुना आहे.

इजिप्तमधील एका जुन्या साइटवर संशोधकांना एक असी ममी मिळाली आहे ज्याची जीभ सोन्याची आहे. इजिप्तच्या प्राचीन परंपरांमध्ये असं म्हटलं जातं की, मृत्यूनंतर हे ममी देवाशी संवाद साधतात. त्यामुळेच ही ममी सोन्याच्या जीभेसह दफन करण्यात आली होती. चला जाणून घेऊ या सोन्याच्या जीभेमागची कहाणी...

सोन्याची जीभ असलेली ममी इजिप्तमधील प्राचीन भाग तापोसिरिस मॅग्नामध्ये सापडली आहे. ही ममी साधारण २ हजार वर्ष जुनी आहे. इजिप्शिअन एंटीक्वीटिस मिनिस्ट्री द्वारे सांगण्यात आले आहे की, त्यावेळी अशी मान्यता राहिली असेल की मृत्यूमुखी पडणारा देवाशी बोलतो, त्यामुळे त्याला सोन्याच्या जीभेसह दफन केलं असेल.

जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात असंही म्हटलं आहे की, इजिप्तच्या प्राचीन कथांमध्ये सांगितलं जातं की, जर सोन्याची जीभ असलेली ममी गॉड ऑफ द अंडरवर्ल्ड म्हणजे पाताळचे देवता ओसिरिसना भेटली तर त्यांच्यासोबत बोलण्यात सोन्याची जीभ मदत करेल. मृत्यूनंतर सोन्याच्या जीभेला देवतांसोबत बोलण्याच्या योग्यतेचं मानलं जातं.

मात्र, सोन्याची जीभ असलेल्या ममीचं सायंटिफिक कारण समोर आलं नाही. ही जीभ सोन्याचीच का तयार केली आहे. याचं कारणही समोर आलेलं नाही. या ममीला मृत्यूवेळी बोलण्याची समस्या होती का ज्यामुळे त्याला सोन्याची जीभ दिली गेली. अशीही शंका वर्तवली जात आहे.

तापोसिरिस मॅग्नाच्या उत्खननादरम्यान नुकत्याच १६ कबरी मिळाल्या होत्या. यातील एक सोन्याची जीभ असलेली आहे. इथे उत्खननाचं काम डॉमिनिकन रिपब्लिकचे कॅथलीन मार्टीनेज करत आहेत. तापोसिरिस मॅग्नामध्ये ओसिरिस आणि आयसिसचे मंदिर आहे. आयसिस ओसिरिसची पत्नी आणि बहिणी दोन्ही होती.

याआधी आर्किओलॉजिस्ट्सना अनेक नाणी सापडल्या होत्या. ज्यावर क्लिओपेट्रो-७ चा चेहरा बनवला आहे. जे हे सांगतं की, या मंदिराचा उपयोग राणी क्लिओपेट्रो-७ च्या काळात केला जात होता. इतर १५ कबरींमधून जेही मिळत आहे, ज्यावरून अनेक जुने खजाने समोर येत आहेत.

कबरेत एका महिलेचा ममी मिळाला. याने डेथ मास्क घातलेला आहे. ज्याने शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकलेला आहे. पण मृत्यूवेळी ती हसत आहे. एका ममीच्या चारही बाजूने स्क्रॉल्स आहेत. ज्यावर शोध सुरू आहे. त्यासोबतच प्लास्टर्ड लेअर्स, कार्टोनज, एनकेसिंग असलेला एक ममी होता.

एका ममीवर ओसिरिसचं गोल्डन डेकोरेशन आहे. काही मूर्तीही सापडल्या आहेत ज्यांवर कोणत्याही प्रकारचं एक्सप्रेशन आणि भाव नाही. पण त्यांचे कपडे आणि हेअरस्टाइल बघितली जाऊ शकते. आर्किओलॉजिस्ट्स हे माहीत नाही की, हे किती जुने आहेत. पण असंही मानलं जात आहे की, हे टोलेमिसच्या शासनादरम्यानचे असावे.

टोलेमिसचं साम्राज्य ३०४ इसवी सन पूर्व ते ३० इसवी सन पूर्वपर्यंत होतं. असं मानलं जातं की, ३० इसवी सन पूर्व नंतर म्हणजे क्लियोपेट्रा-७ च्या मृत्यूनंतर इथे रोमन साम्राज्य स्थापन झालं. किंवा सिकंदरच्या एखाद्या वंशजाने इथे शासन केलं असेल.

इजिप्त आणि डॉमिनिकन रिपब्लिकची यूनिव्हर्सिटी ऑफ सांटो डोमिंगोचे संशोधक तापोसिरिस मॅग्नामध्ये उत्खननाचं काम करत आहे. यांची टीम लीटर आहे कॅथलीन मार्टीनेज. कॅथलीन आणि त्यांची टीम इजिप्तचे जुने रहस्य शोधत आहेत.