Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच.......

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:44 PM2021-03-18T17:44:23+5:302021-03-18T18:06:58+5:30

Prime minister benjamin netanyahu nude statue : इस्त्राईलच्या पंतप्रधानांसाठी ही निवडणूक महत्वपूर्ण असल्याचे सांगितले आहे.

इस्त्राईलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा एक न्यूड पूतळा अवीव शहराच्या हाबिमा स्वायर परिसरात आढळून आला आहे. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा एक न्यूड पूतळा अवीव शहराच्या हाबिमा स्वायर परिसरात ठेवण्यात आला आहे.

इस्त्राईलचे माध्यम जेरूलसेम पोस्टच्या रिपोर्टनुसार या कांस्याच्या पुतळ्यात पंतप्रधान स्क्वॉट्सच्या मुद्रेत बसले आहेत. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अधिक चौकशी सुरू आहे.

पाच मीटर लांब आणि सहा टन वजनाच्या या पुतळ्यावर इस्त्राईली हिरो असं लिहिलं आहे. दरम्यान आतापर्यंत हा पुतळा कोणी बनवला याबाबत माहिती मिळालेली नाही. या पुतळ्याला बेंजामिन यांच्या निषेधार्थ चौकात ठेवलं गेल आहे. इस्त्राईलचे पंतप्रधान पुढच्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत.

राखाडी रंगाचा हा पुतळा सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. आजूबाजूचे तसंच या ठिकाणी पोहोचणारे लोक या पुतळ्याचं बारकाईनं निरिक्षण करत आहेत.

मागच्या दोन वर्षातील ही इस्त्राईलमधील चौथी निवडणूक असणार आहे. इस्त्राईलच्या पंतप्रधानांसाठी ही निवडणूक महत्वपूर्ण असल्याचे सांगितले आहे.

याआधीसुद्धा इस्त्राईलच्या पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी रेबिन स्कवॉयरमध्ये एक बेंजामिनचा मोठा स्टॅच्यू लावण्यात आला होता. हा पुतळा लिओ नार्डो द विन्सी यांच्या प्रसिद्ध द लास्ट सपरचे अनुकरण असल्याचे सांगितले जात होते.

मागच्या वर्षीही इस्त्राईली पंतप्रधानांचा पुतळा तयार केल्याचा प्रकार समोर आला होता. एका कलाकारानं Itay Zalait मध्ये बेंजामिन यांच्या पुतळा लावला होता.