सातत्याने वाढतीये हिमालयाची उंची; भारतीय आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटांमुळे भूकंपात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 05:37 PM2023-08-11T17:37:11+5:302023-08-11T17:44:10+5:30

भारतीय आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटांच्या टक्करीमुळे या भागात सातत्याने भूकंप होतात.

जगातील सर्वात उंच पर्वतरांग असलेल्या हिमालयाने त्याच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत 60 टक्के उंची गाठली आहे. विशेष म्हणजे यात सातत्याने वाढ होत आहे. हिमालयाची उत्पत्ती कधी झाला? तर सुमारे 4.5 ते 5.9 दशलक्ष वर्षांपूर्वी. भारतीय टेक्टोनिक प्लेटची चिनी टेक्टोनिक प्लेटशी टक्कर झाल्यामुळे हिमालय तयार झाला. पण आता त्याची उंची वाढत आहे.

हिमालयाची उंची वाढल्यामुळे शास्त्रज्ञही चकीत झाले आहेत. हिमालयाची उंची वाढण्याचे कारण, युरेशियन टेक्टोनिक प्लेट आणि भारतीय टेक्टोनिक प्लेट सतत एकमेकांवर दबाव टाकत आहेत. म्हणजेच एकमेकांना टक्कर मारत आहेत. या टक्कर आणि दाबामुळे आसपासच्या भागात वारंवार भूकंप होत राहतात.

भूकंप कधी तीव्र तर कधी सौम्य तीव्रतेचे असतात. हिमालयाच्या निर्मितीची प्रक्रिया 6.3 ते 6.1 कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली. पण जेव्हा युरेशियन प्लेट्स भारतीय प्लेटला आदळल्या, तेव्हा हिमालयाची उंची त्यांच्यापेक्षा निम्मी झाली होती. म्हणजेच हिमालयाची निर्मिती केवळ भारत आणि चीन यांच्यातील टक्करीमुळे झालेली नाही.

ब्राउन युनिव्हर्सिटीतील पृथ्वी, पर्यावरण आणि ग्रह विज्ञानातील सहाय्यक प्राध्यापक डॅनियल एनरिक इबारा यांनी सांगितले की, पूर्वी असे मानले जात होते की भारत आणि युरेशियन प्लेट्स या दोन खंडांच्या टक्करमुळे हिमालयाची निर्मिती झाली आहे. पण 10 ऑगस्ट रोजी नेचर जिओसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, एक नवीन गोष्ट समोर आली आहे.

अभ्यासानुसार, महाद्वीपांच्या प्लेट्सची टक्कर होण्यापूर्वीच हिमालयाने सुमारे 60 टक्के उंची गाठली होती. डॅनियल सांगतात की, हिमालयाच्या आजूबाजूचे वातावरण समजून घेण्यासाठी आमचा अभ्यास महत्त्वाचा ठरू शकतो. तसेच यातून त्याकाळचे वातावरणही समजण्यास मदत होईल आणि इतर पर्वतरांगांबाबतही माहिती मिळेल.

हिमालय पर्वतांची सरासरी उंची 20 हजार फूट आहे. तर जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट 29,032 फूट आहे. शास्त्रज्ञांकडे पर्वतांची उंची मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत. यातील एक मार्ग म्हणजे ट्रिपल ऑक्सिजन अॅनालिसिस. या पद्धतीने उल्कापिंडांचा अभ्यास केला जातो.

ज्या डोंगरांचे उतार वाऱ्याच्या दिशेने असतात, त्यांच्यावर पाऊस जास्त पडतो. त्यांना लीवर्ड स्लोप म्हणतात. पावसामुळे जुने आयसोटोप्स सखल भागात पोहोचतात. अशा बदलांचा अभ्यास करून कोणत्याही दगडाच्या उंचीची माहिती मिळू शकते. यावरुन असे दिसून आले की हिमालयाची सरासरी उंची 62 दशलक्ष वर्षांपूर्वी 11,480 फूट होती.

डॅनियलने सांगितले की, हिमालयाची सुरुवातीची उंची भारतीय टेक्टोनिक प्लेटच्या सागरी भागाच्या दाबाने आली. त्यानंतर जेव्हा वरचा पृष्ठभाग घसरला तेव्हा त्याला अधिक उंची मिळाली. हा वरचा पृष्ठभाग युरेशियन प्लेटसह हिमालयाला उंची देत ​​आहे.

45 ते 59 दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करमुळे हिमालयाची उंची एक किलोमीटरने वाढली होती. टेक्टोनिक प्लेट्सची ताकद सतत वाढत आहे. ते हिमालयाची उंची सतत वाढवत आहेत. दोन्ही खंड असेच एकमेकांना भिडत राहिले तर हे पर्वत वर जात राहतील. या अभ्यासामुळे अनेक प्रकारच्या हंगामी बदलांचा अभ्यास करता येतो.