ना दात, ना डोक्यावर केस, १८ वर्षाची ही मुलगी झाली होती १४४ वर्षाची!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 02:59 PM2021-07-22T14:59:38+5:302021-07-22T15:08:08+5:30

स्मिथबाबत बोलताना कार्टराइट म्हणाली की, स्मिथची ज्याप्रमाणे परिस्थिती होती तरी सुद्धा ती कधी मानसिकपणे नकारात्मक विचार करत नव्हती.

हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिट याने काही वर्षांपूर्वी 'क्यूरिअस केस ऑफ बेंजामिन बटन' नावाचा सिनेमा केला होता. ज्यात ब्रॅडची भूमिका जेव्हा जन्म घेतो तेव्हा ती वयोवृद्ध असते आणि जेव्हा तो मरणार असतो तेव्हा तो बाळ बनतो. अशीच कहाणी आहे अशांति स्मिथची.

इंग्लंडच्या वेस्ट ससेक्समध्ये राहणारी स्मिथ जगातल्या सर्वात दुर्मिळ सिंड्रोमने ग्रस्त आहे. स्मिथला हचिनसन गिलफॉर्ड प्रोगेरिया सिंड्रोम आहे. ज्यामुळे ती जेव्हा वयाचं एक वर्ष पूर्ण करते तेव्हा तिचं शरीर पुढील आठ वर्षाने अधिक वाढतं. त्यामुळेच १८ वर्षीय स्मिथचं शरीर १४४ वर्षाच्या व्यक्तीसारखं झालं आहे.

१७ जुलैला स्मिथचा मृत्यू झाला. ती केवळ १८ वर्षाची होती. पण तिला पाहून हे कुणीही म्हणू शकत नव्हतं की, ती १८ वर्षांची आहे. स्मिथचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा तिचे ३३ वर्षीय वडील, तिची आई आणि २५ वर्षीय मैत्रीण कार्टराइट तिच्यासोबत होते. स्मिथचे तिच्या आईसाठी अखेरचे शब्द होते, 'आता तू मला जाऊ द्यायला हवं'.

स्मिथची आई म्हणाली की, प्रोगेरियाने तिच्या मोबिलिटीवर परिणाम झाला. लाइफबाबत तिचा उत्साह जराही कमी नव्हता. गंभीर सिंड्रोम असूनही ती चिंतेत राहत नव्हती. ती तिच्या मनातलं आम्हाला सांगत होती. तिची इच्छाशक्ती फार स्ट्रॉंग होती. तिने तिच्या हिंमतीने लोकांच्या मनात जागा निर्माण केली.

१४४ वर्षांचं शरीर झाल्यावरही स्मिथ तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवत होती. मे महिन्यात तिने तिचा १८वा वाढदिवस साजरा केला होता आणि यावेळी तिने तिच्या फेवरेट ड्रिंक कॉकटेलचाही आनंद घेतला.

स्मिथबाबत बोलताना कार्टराइट म्हणाली की, स्मिथची ज्याप्रमाणे परिस्थिती होती तरी सुद्धा ती कधी मानसिकपणे नकारात्मक विचार करत नव्हती. ती फार नॉर्मल होती. तिचं शरीर भलेही १०० वर्षापेक्षा अधिकचं होतं. पण तिचं हृदय १८ वर्षाचं होतं.

दरम्यान, ब्रॅड पिटचा सिनेमा आल्यावर या दुर्मीळ कंडीशन प्रोगेरियाला बेंजामिन बटन म्हटलं जाऊ लागलं होतं. हा एक फार दुर्मीळ आजार आहे. कोणत्याही बाळात याची माहिती दोन वर्षानंतर मिळते. सामान्यपणे या सिंड्रोमच्या बाळांचे केस गळू लागतात. त्यांचा विकास खुंटतो आणि या सिंड्रोमने ग्रस्त लोक १४ व्या वयात मरण पावतात.