हिला स्वत:चा चेहरा सुंदर बनवण्याऐवजी भयानक बनवायला आवडतो, यामागे आहे 'हे' विचित्र कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 07:29 PM2021-11-02T19:29:21+5:302021-11-02T19:50:03+5:30

स्वतः सुंदर दिसणं, मेकअप करणं कोणाला आवडत नाही? महिलांपासून ते पुरुषांपर्यंत सर्वजणच आपला लूक सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जिला तिचा लुक खराब करण्यात मजा येते. ही महिला तिच्या चेहऱ्यावर विचित्र पेंटिंग्ज बनवते, ज्याला पाहून चांगले लोक भीतीने थरथर कापू लागतात.

निक्की हिल ही एक मेकअप आर्टिस्ट (England Woman Makeup Artist) आहे, जिला तिच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग्ज बनवायला आवडतात.

अनेकवेळा ती एखाद्या सेलेबचा चेहरा हुबेहुब तिच्या चेहऱ्यावर रंगवते आणि तिच्यासारखी दिसायला लागते.

इंग्लंडमधील ग्रेटर मँचेस्टरमध्ये राहणारी २७ वर्षीय निक्की हिल ही एक मेकअप आर्टिस्ट (England Woman Makeup Artist) आहे.

सर्वात खास म्हणजे निकीची हॅलोवीन पेंटिंग्ज (Halloween Painting). निक्कीला हॅलोविनचा सण आवडतो ज्यामध्ये लोक भूत आणि राक्षसांसारखे पोशाख करतात आणि त्यांच्यासारखे मेकअप देखील करतात.

निक्कीला झोम्बी, भूत, डायन सारखे लूक तयार करण्यासाठी 6 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. तिच्या इन्स्टाग्रामवर, ती तिच्या मेकअपशी संबंधित व्हिडिओ देखील पोस्ट करते, ज्यामध्ये ती लोकांना दाखवते की तिने असा हॉरर मेकअप (Horror Face Makeup) कसा केला.

निक्की तिच्या चेहऱ्याचा कॅनव्हाससारखा वापर करतो आणि चेहऱ्यावर ती भ्रामक चित्रे आणि मेकअप साकारते. जी पाहून अनेकांना भीती वाटते.

डेली स्टारशी बोलताना निक्की म्हणाली- "हॅलोवीन हा माझा आवडता सण आहे. यावेळी मला क्रिएटिव्ह होण्याची संधीही मिळते. लहानपणापासून मला हॉरर चित्रपट पाहण्याची खूप आवड आहे आणि जेव्हा मी त्या चित्रपटांच्या भुतांसारखी पेंटींग करते, त्यावेळी मला त्याचा जास्त आनंद होतो.”

तिची आवडती डिझाइन तयार करण्यासाठी, निक्की प्रथम त्या पात्राचा फोटो पाहते. ती चेहऱ्याच्या हाडांचा आणि आकृतिबंधांचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करते आणि नंतर चेहऱ्यावर डिझाइन्स बनवायला सुरुवात करते. यानंतर ती शेडिंग करते जेणेकरून पेंटिंग अधिक सुंदर होईल.

निक्कीने सांगितले की, तिला क्रिएटिवीटीची डार्क बाजू अधिक आवडते. जेव्हा लोक तिचे पेंटिंग एकदा पाहतात आणि नीट समजून घेण्यासाठी पुन्हा पाहतात तेव्हा तिला अधिक चांगले वाटते. तिने सांगितले की, पूर्वी तिला इतरांचा मेकअप करायला आवडायचा, पण जेव्हापासून तिने स्वतःच्या चेहऱ्यावर मेकअप करायला सुरुवात केली तेव्हापासून ती स्वतःवर प्रयोग करू लागली.

निक्कीला इंस्टाग्रामवर हजारो लोक फॉलो करतात, जे तिच्या फोटोंना पसंत करतात. निक्कीला आता टीव्ही आणि चित्रपटांसाठी मेकअप आर्टिस्ट बनायचे आहे. विविध क्रिएटीव फोटो पाहून लोक आपली स्तुती करतात, तेव्हा खूप छान वाटतं, असं ती म्हणते.