चिंताजनक! मधमाशांकडून ६४ आफ्रिकन पेंग्विन्सची हत्या; विचित्र घटनेनं वैज्ञानिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 03:50 PM2021-09-22T15:50:26+5:302021-09-22T15:56:42+5:30

दक्षिण आफ्रिकेत एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यामुळे वैज्ञानिकही हैराण झालेत. याठिकाणी मधमाशांनी ६४ आफ्रिकन पेग्विंन्सला ठार मारलं आहे. त्यामुळे पेंग्विन्स प्रजाती धोक्यात आली आहे. मधमाश्यांनी त्यांच्या डोळ्यांवर हल्ला केला आहे.

डोळ्यात दंश करून मधमाशांनी विष सोडल्यानं पेंग्विन्सचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगात या प्रजातीच्या केवळ ४२ हजार पेंग्विन्स शिल्लक आहेत. आफ्रिकन पेंग्विन्सला वैज्ञानिक भाषेत स्फेनिसकस डेमेरसस म्हणतात. ज्या मधमाशांनी यांच्यावर हल्ला केला आहे. त्यांचं नाव केप हनी बी असं आहे.

साऊथ आफ्रिकन नॅशनल पार्क ऑर्गेनायझेशन रेंजर्स कॅप टाऊनजवळ टेबल माऊंटेन नॅशनक पार्कच्या ६४ पेंग्विन्स मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली. या पार्कमध्ये पेग्विन्स सुरक्षित आणि त्यांचा बचाव करण्यासाठी ठेवण्यात आले होते. पेंग्विन्सची ही प्रजाती इंटरनॅशनल यूनियन फॉर कंजरवेशन ऑफ नेजरच्या लाल यादीत आहे.

SANParks ने त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, गुरुवारी दुपारपासून या पेग्विन्सचा मृत्यू होण्यास सुरुवात झाली आहे. पेंग्विन्सच्या शरीरावर बाहेरून कुठल्याही प्रकारचे इतर पक्षांनी हल्ला केल्याचे निशाण आढळले नाही. जेव्हा पेग्विंन्सच्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले तेव्हा त्यांच्या डोळ्यांजवळ आणि त्या आसपास मधमाशांनी दंश घेतल्याचं आढळलं होतं.

साऊथ आफ्रिकन फाऊंडेशन द कंजरवेशन ऑफ कोस्टल बर्ड्सच्या डेविड रॉबर्ट्स यांनी सांगितले की, आम्हाला नेक्रोपसीस आणि चौकशीनंतर मधमाशांनी पेग्विंन्सवर हल्ला केल्याचं कळालं. ज्याठिकाणी पेग्विंन्सचे मृतदेह आढळले तिथे मेलेल्या मधमाशाही होत्या. परंतु या मधमाशांनी पेग्विंन्सवर निशाणा का साधला? याबाबत अद्याप कारण समोर आलं नाही.

वैज्ञानिक या गोष्टीने हैराण आहेत की, मधमाशा संपूर्ण शरीरावर हल्ला करू शकत होती. परंतु त्यांनी शरीराच्या एका विशिष्ट भागाला निशाणा का बनवलं त्यामुळे ते हैराण आहेत. ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. १७ सप्टेंबर २०२१ रोजी ६३ पेग्विंन्स मृत अवस्थेत आढळले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक पेग्विंन्स मृत अवस्थेत आढळला

परंतु या घटनेनंतर एकाही पेग्विंन्सचा मृत्यू झाला नाही. रेंजर्स वारंवार या परिसरावर लक्ष ठेऊन आहेत. आफ्रिकन पेग्विन्सचं वजन २.२ किलो ते ३.५ किलो इतकं असतं तर ते २४ ते २८ इंच उंच असतात. यांच्या डोळ्यांवरती गुलाबी रंगाचं निशाण असतं. याच गुलाबी रंगाला मधमाशांनी फूल समजलं असावं असं जीव वैज्ञानिक सांगतात

नर आफ्रिकन पेग्विंन्स मादीच्या तुलनेत थोडे जास्त मोठे असतात. ते दक्षिण आफ्रिकेतील किनाऱ्यावर २४ बेटांवर आढळतात. ही बेटं नामीबिया, अलगोआ बे पोर्ट एलिजाबेथजवळ असतात. याच ठिकाणी कॉलोनियो राहतात. सर्वात मोठी कॉलोनी बोल्डर बीचवर आढळतात.

१९ व्या शतकात आफ्रिकन पेंग्विन्सची संख्या ४० लाखाच्या आसपास असते. १९१० नंतर ही संध्या १५ लाखांवर आली. आता संपूर्ण जगात केवळ ४२ हजार संख्या आहे. या पेग्विंन्सचा शिकार करण्याविरोधात सरकारनं कठोर नियम बनवले आहेत. या पेंग्विन्सच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे.

सामान्यपणे आफ्रिकन पेंग्विंन्सचे वय १० ते १५ वर्ष असतं. जर ते सुरक्षित ठिकाणी असतील तर ३० वर्षही ते जगू शकतात. परंतु यांचा शिकार करणारे जीव त्यांची संख्या वाढू देत नाही. शार्क , फर सील्स, केल्प गुल्स, मांजर, कुत्रे इ. प्राणी त्यांच्यावर हल्ला करतात. जर पेंग्विन्सची कॉलनी खुल्या जागेत असेल तर त्यांच्या जीविताला जास्त धोका असतो.

Read in English