३०० वर्षांपासून उलगडलं नाही डोंगरात दिसणाऱ्या 'या' सावल्यांचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 02:04 PM2021-03-16T14:04:24+5:302021-03-16T14:10:04+5:30

या सावल्यांना कॅलिफोर्नियामध्ये डार्क वॉचर्स म्हणतात. या सावल्या धुसर होतात. अनेकदा १० लांब आणि जास्तीत जास्त हॅट-टोपी आणि जॅकेट घालून दिसतात. सामान्यपणे या दुपारी किंवा रात्री अंधार झाल्यावर हलक्या दिसतात.

कॅलिफोर्नियातील लोक काही सावल्यांमुळे हैराण झाले आहेत. या सावल्या हॅट आणि जॅकेट घातलेल्या व्यक्तीसारख्या असून सॅंटा लूसिया मांउटेनवर फिरताना दिसतात. अनेकदा तर या सावल्या आकाशात उडतानाही दिसतात. काही सेकंद त्या दिसतात आणि गायब होतात. गेल्या ३०० वर्षांपासून या डोंगरावर जाणारे हायकर्स या सावल्या बघतात. त्यांनी त्याच्या रिपोर्टमध्ये याचा उल्लेखही केला आहे. पण अजूनही या सावल्यांचं रहस्य उलगडलं गेलेलं नाही.

या सावल्यांना कॅलिफोर्नियामध्ये डार्क वॉचर्स म्हणतात. या सावल्या धुसर होता. अनेकदा १० लांब आणि जास्तीत जास्त हॅट-टोपी आणि जॅकेट घालून दिसतात. सामान्यपणे या दुपारी किंवा रात्री अंधार झाल्यावर हलक्या दिसतात.

कॅलिफोर्नियातील सॅंटा लूसिया माउंटेनवर जे लोक गेल्या ३०० वर्षांपासून हायकिंगसाठी गेले किंवा जातात. त्यांनी या डार्क वॉचर्सबाबत माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत सांगितले की, या डार्क वॉचर्सने कुणाला नुकसान पोहोचवलं नाही.

डार्क वॉचर्स हा शब्द प्रयोग स्पॅनिश हायकर्सनी केला होता. तेव्हा ते पहिल्यांदा १७०० मध्ये सॅंटा लूसिया माउंटेनवर हायकिंगसाठी गेले होते. त्यानंतर या भागात एंग्लो-अमेरिकन लोक राहू लागले. या लोकांनाही या सावल्या दिसल्या.

प्रसिद्ध अमेरिकन लेखक जॉन स्टीनबेक यांनीही डार्क वॉचर्स पाहिल्या. त्यानंतर त्यांनी १९३८ मध्ये त्यांच्या 'फ्लाइट' या कथेत याचा उल्लेख केला होता. स्टीनबेक यांनी लिहिले होते की, कुणालाही माहीत नाही की, हे डार्क वॉचर्स कुठून येतात. कोण आहेत. त्यांचा इतिहास काय आहे. ते कुठे राहतात. पण चांगलं हेच ठरेल की त्याकडे दुर्लक्ष करा. त्यात इंटरेस्ट घेऊ नका.

काही मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, डार्क वॉचर्ससारखी कोणतीही गोष्ट नाहीये. हे डोंगरावर प्रकाश आणि अंधारामुळे तयार होणाऱ्या आकृती आहे. त्यांना लोक सावल्या समजतात. हा केवळ मनाचा भ्रम आहे. ही पॅरीडोलियाची केस आहे.

तेच काही लोकांचं मत आहे की, या सावल्या डोंगराची स्थिती, प्रकाश आणि ढगांमुळे तयार होतात. त्याला लोक डार्क वॉचर्स म्हणतात. या सावल्या दुपारी आणि त्यानंतर दिसतात कारण सूर्याची पोजिशन तशी असते. ज्यामुळे सावल्या तयार होतत.

अशाच काही घटना हार्ज माउंटेनजवळ राहणाऱ्या जर्मनीतील स्थानिकांकडूनही ऐकायला मिळतात. ते सांगतात की त्यांनाही शेकडो वर्षांपासून ब्रोकेन पीकवर असे डार्क वॉचर्स दिसतात. सामान्यपणे हे तेव्हा होतं जेव्हा डोंगरावर ढग असतात आणि सूर्य उलट्या दिशेने असतो.

काही सावल्यांवर तर सतरंगी रेनबो सुद्धा दिसतो. हार्ज माउंटेनवर ही प्रक्रिया फार सामान्य आहे. कारण तिथे धुकं, ढग असल्यामुळे नेहमीच दवबिंदू जमा असतात.