खरं की काय? रोज ११५ समोसे अन् १२ लीटर कोल्डड्रिंक्स प्यायचा, बटर चिकन खाता खाता आलं मरण

By manali.bagul | Published: January 3, 2021 04:32 PM2021-01-03T16:32:57+5:302021-01-03T16:43:06+5:30

सध्याच्या काळात लठ्ठपणा ही मोठी समस्या बनली आहे. बदलत्या जीवनशैलीत अनेक लोक लठ्ठपणाचे शिकार झाले आहेत. जगातील काही लोक असे आहेत. जे आपल्या लठ्ठपणामुळे प्रसिद्ध आहेत. ब्रिटनचे रहिवासी असलेले ५२ वर्षीय बॅरी ऑस्टीन आपल्या लठ्ठपणामुळे प्रचंड चर्चेत आहेत. आपल्या प्रियसीला मिळवण्यासाठी त्यांनी २०१२ ला त्यांनी वजन कमी कले होतं.

आता पुन्हा एकदा बॅरी मृत्यूमुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत. ऑस्टिन खाण्याचे खूप शौकिन आहेत. त्यांना इंडियन कुकीज खायला सुद्धा आवडायच्या. त्यांनी आपल्या आयुष्यात खात पित राहण्याचा निर्णय घेतला होता. वजन वाढलं असूनही जेवण कमी करण्याचा विचारही कधी केला नाही. त्यांचे वजन ४१२ किलो होते.

युकेतील ब्रर्मिंघ युनिव्हर्सिटीने बॅरी यांच्या मृत्यूबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. बॅरी ब्रिटनचे सगळ्यात जाड माणूस होते. गेल्या काही दिवासांपासून त्यांना श्वास घेण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागत होता.

बॅरी यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर ब्रिटनमधील सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आतापर्यंत ऑस्टिनच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. बॅरी रोज २९ हजार कॅलरीज घेत होते. १ डीप फ्राईड समाोश्यात २५२ कॅलरीस असतात. या हिशोबाने बॅरी दिवसातून ११५ समोसे खात होते. याशिवाय त्यांच्या आहारात १२ लीटर कोल्डड्रिंक्स सुद्धा समावेश होता.

आपल्या खाण्याच्या सवयीमुळे बॅरी अनेकदा टीव्ही शोव्हजवर आले आहेत. एकदा खायला सुरूवात केली तर ते लवकर थांबायचं नाव घ्यायचे नाहीत.

ऑस्टिन हे लहानपणापासून गुबगुबीत होते. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एकदा नाईट आऊट करताना बॅरी यांनी ४० बीअर प्यायल्या होत्या. त्यावेळी फॅट बज अंतर्गत एका वृत्तपत्रात त्यांच्याबद्दल माहिती छापून आली होती.

बर्मिंघमच्या एफसी फुटबॉल ग्राऊंडमध्ये १९९७ मध्ये ऑस्टीन यांच्यासाठी एक खास खुर्ची लावण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूने फुटबॉल असोशियेशनने सुद्धा दुःख व्यक्त केलं आहे.

(Image Credit- AsianetNews)