BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा

भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 07:18 PM2024-05-01T19:18:01+5:302024-05-01T19:18:31+5:30

whatsapp join usJoin us
BANW vs INDW T20I Series Golden Chance for Team India to Dominate Series | BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा

BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BANW vs INDW T20I Series: भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. सध्या बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने चमकदार कामगिरी करून पहिले दोन सामने जिंकले. त्यामुळे गुरुवारी होत असलेला तिसरा सामना जिंकून एकतर्फी वर्चस्व राखून मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. बांगलादेशातील सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सर्व सामने खेळवले जात आहे. 

पहिला सामना एकतर्फी झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पावसाच्या बॅटिंगमुळे भारताला विजयी घोषित करण्यात आले. भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा, राधा यादव आणि श्रेयांका पाटील सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत. वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने तिच्या घातक गोलंदाजीने यजमानांना घाम फोडला. महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामानंतर प्रथमच भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. आगामी काळात होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्हीही संघांसाठी महत्त्वाची आहे. 

बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दयालन हेमलथा, दीप्ती शर्मा, एस सजना, शेफाली वर्मा, श्रेयांका पाटील, अमनज्योत कौर, पूजा वस्त्राकर, अशा सोभना, यास्तिका भाटिया, रिचा घोष, राधा यादव, रेणुका सिंग ठाकूर, तितस साधू, साइका इशाक. 

पुढील तीन सामने -
२ मे - तिसरा सामना - सिल्हेट
६ मे - चौथा सामना - सिल्हेट
९ मे - पाचवा सामना - सिल्हेट

Web Title: BANW vs INDW T20I Series Golden Chance for Team India to Dominate Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.