अजब नवरीची गजब कहाणी; लग्नासाठी ठेवलेली 'ही' अट पाहून पाहुणेमंडळी काढतायेत पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 12:22 IST2020-01-22T12:07:59+5:302020-01-22T12:22:51+5:30

वधू-वरांसाठी लग्नाचा दिवस खास असतो. या दिवशी अनेक नातेवाईक पाहुणे मंडळी वधुवराला आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि त्यांच्या आनंदात सामील होतात. पण एका वधूने तिच्या लग्नासाठी अशी अट घातली आहे की तिच्या लग्नात हजर राहण्यापासून बहुतेक पाहुणे पळ काढताना दिसत आहे.
अमेरिकेची एक वधू लग्नात येणाऱ्या पाहुण्यांकडून तिच्या लग्नाचा खर्च वसूल करण्याची तयारी करत आहे. लग्नात येण्यासाठी पाहुण्यांवर वधूने प्रवेश शुल्क लादलं आहे.
डेन्टी नावाच्या १९ वर्षांच्या मुलीने ही घटना फॉक्स न्यूजशी शेअर केली आहे. डेन्टीने सांगितले की तिची चुलत बहिण तिच्या लग्नात येणार्या प्रत्येक पाहुण्यांकडून $50 (3,500 RS) मागतेय.
याबाबत वधुने सांगितले की, जे अतिथी पैसे देऊन येतील त्यांना कोणत्याही सुविधेची प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि त्यांना खास पाहुण्यांच्या यादीमध्ये स्थान दिलं जाईल.
या संपूर्ण घटनेवर नाराज डेन्टी म्हणतो की तिच्या चुलत बहिणीला पाहुण्यांकडून पैसे घ्यायचे आहेत आणि तिच्या लग्नाचा खर्च काढायचा आहे. जर तुम्हाला स्वतःचे लग्न परवडत नसेल तर तुम्ही लग्न न करणे चांगले अशा शब्दात त्याने नाराजी व्यक्त केली.
वधूच्या या वृत्तीमुळे तिला सोशल मीडियावर बरेच ट्रोल केले जात आहे.